शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात चरस तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कैद्यासाठी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या कारागृहाच्याच एका कर्मचाऱ्याचा डाव कारागृह अधीक्षकांच्या सतर्कतेमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कैद्यासाठी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या कारागृहाच्याच एका कर्मचाऱ्याचा डाव कारागृह अधीक्षकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. चरसची खेप घेऊन कारागृहात दाखल होताच बुधवारी सायंकाळी तस्करी करणाऱ्या कर्मचाऱ्याला तुरुंग रक्षकांनी जेरबंद केले. त्याच्याकडून २७ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. त्याला नंतर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

मंगेश मधुकर सोळंकी (वय २९) असे दोषी तुरुंग कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो मूळचा अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून दोन वर्षांपूर्वीच कारागृहात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सोळंकीचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने कारागृह अधीक्षक अनुपकुमर कुमरे यांनी अन्य तुरुंग रक्षकांना त्याच्यावर नजर ठेवायला सांगितली होती. या पार्श्वभूमीवर, सोळंकी बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कारागृहात दाखल झाला. त्याने आमद देताच (एन्ट्री करणे) त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याची झडती घेतली. त्याच्या डाव्या पायाच्या सॉक्समध्ये एक पाऊच आढळला. तो उघडून बघितला असता त्यात चरस आढळले. वजन केले असता पाऊचमधील चरसचे वजन २७ ग्रॅम भरले. ही माहिती कळाल्यानंतर कारागृह अधीक्षक कुमरे यांनी त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

---

तीन हजारांची डील

अधीक्षक कुमरे यांनी चरसच्या तस्करीबाबत सोळंकीची नंतर प्रदीर्घ चौकशी केली. कारागृहात गोपी नामक कुख्यात गुंड बंद आहे. हत्येच्या गुन्ह्यात त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. गोपी चरसी आहे. त्याला चरस पिण्यासाठी हवी, ती कारागृहाच्या आत पोहोचवण्यासाठी सोळंकीने गोपीच्या नंबरकारीसोबत (बाहेर असलेल्या साथीदारांसोबत) तीन हजारांत डील केली होती. बुधवारी दुपारी गोपीच्या नंबरकारीने सोळंकीला चरसची खेप दिली. ती घेऊन तो कारागृहाच्या आत पोहोचला अन् पकडला गेला.

----

मध्यरात्री पोहोचले पोलीस

सोळंकीची अंतर्गत चौकशी केल्यानंतर कारागृहाच्या उच्चाधिकाऱ्यांना हा अहवाल पाठविला गेला. त्यानंतर पोलिसांना रात्री उशिरा तक्रार देण्यात आली. त्यानुसार मध्यरात्री धंतोलीचे पोलीस कारागृहात पोहोचले. आरोपी सोळंकीला त्यांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करून सोळंकीला अटक केली.

----