शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

नऊ सुपरफास्ट रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:00 IST

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणाऱ्या नऊ सुपरफास्ट विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. त्यामुळे या रेल्वेगाड्या आता ...

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणाऱ्या नऊ सुपरफास्ट विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. त्यामुळे या रेल्वेगाड्या आता बदललेल्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, रेल्वेगाडी क्रमांक ०२८०५ विशाखापट्टणम-नवी दिल्ली विशेष रेल्वेगाडी १ डिसेंबर २०२० पासून विशाखापट्टणम येथून रात्री १० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी बल्लारशाहला सकाळी ११.१५, चंद्रपूरला ११.३८, नागपूरला दुपारी २.१५ वाजता आणि तिसऱ्या दिवशी नवी दिल्लीला पहाटे ५.४० वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२८०६ नवी दिल्ली-विशाखापट्टणम विशेष रेल्वेगाडी १ डिसेंबरपासून नवी दिल्लीवरून रात्री ८ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३५ वाजता, चंद्रपूरला दुपारी १ वाजता, बल्लारशाहला २.०५ वाजता आणि विशाखापट्टणमला तिसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०८४०५ पुरी-अहमदाबाद विशेष रेल्वेगाडी २ डिसेंबरपासून पुरीवरून सायंकाळी ७.२० वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता, वर्धा ३.५५, बडनेरा सायंकाळी ५.४२, अकोला ६.४० आणि अहमदाबादला तिसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०८४०६ अहमदाबाद-पुरी विशेष रेल्वेगाडी ४ डिसेंबरपासून अहमदाबादवरून सायंकाळी ७ वाजता सुटेल. ही गाडी अकोला येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता, बडनेरा ८.०२ वाजता, वर्धा ९.२८ वाजता, नागपूरला १०.५० वाजता आणि तिसऱ्या दिवशी पुरी येथे सकाळी ६.५५ वाजता पोहोचेल. आठवड्यातून दोनवेळा धावणारी रेल्वेगाडी क्रमांक ०२६६९ चेन्नई सेंट्रल-छपरा ३० नोव्हेंबरपासून चेन्नई सेंट्रलवरून सायंकाळी ५.४० वाजता सुटेल. ही गाडी चंद्रपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ७.१८ वाजता, सेवाग्रामला ९ वाजता, नागपूरला १०.२५ वाजता आणि तिसऱ्या दिवशी छपरा येथे सकाळी ९.३५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२६७० छपरा-चेन्नई सेंट्रल छपरावरून रात्री ९ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी नागपूरला सायंकाळी ६.१५ वाजता, सेवाग्रामला ७.१८ वाजता, चंद्रपूरला रात्री ९.०५ वाजता आणि तिसऱ्या दिवशी चेन्नई सेंट्रलला सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२८४३ पुरी-अहमदाबाद विशेष रेल्वेगाडी १ डिसेंबरपासून पुरीवरून सायंकाळी ५.३० वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता, वर्धा येथे ३.५५, बडनेरा सायंकाळी ५.४२ वाजता, अकोला ६.४० वाजता वाजता आणि अहमदाबादला तिसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२८४४ अहमदाबाद-पुरी विशेष रेल्वेगाडी ३ डिसेंबरपासून अहमदाबादवरून सायंकाळी ७ वाजता सुटेल. ही गाडी बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०२ वाजता, वर्धा येथे ९.०८ वाजता, नागपूरला १०.५० वाजता आणि पुरीला तिसऱ्या दिवशी सकाळी ८.०५ वाजता पोहोचेल. बदललेल्या वेळापत्रकानुसार प्रवाशांनी आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

...................