शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

नागपुरातील  मध्य प्रदेश बसस्थानकाची जमीन रिकामी करण्याला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 8:59 PM

गणेश टेकडी मंदिरापुढील २.१८ हेक्टर जमीन रिकामी करण्याच्या आदेशाला मध्य प्रदेश मार्ग परिवहन महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. ही जमीन १९६२ पासून महामंडळाच्या ताब्यात व वापरात आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : प्रकरणात यथास्थिती ठेवण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गणेश टेकडी मंदिरापुढील २.१८ हेक्टर जमीन रिकामी करण्याच्या आदेशाला मध्य प्रदेश मार्ग परिवहन महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. ही जमीन १९६२ पासून महामंडळाच्या ताब्यात व वापरात आहे.या प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक बाबी लक्षात घेता या प्रकरणात पुढील तारखेपर्यंत यथास्थिती ठेवण्याचे निर्देश दिलेत. तसेच, राज्याच्या महसूल विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख अधीक्षक व केंद्रीय संरक्षण विभागाचे सचिव यांना नोटीस बजावून यावर आठ आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितले.याचिकेतील माहितीनुसार, ही जमीन सीताबर्डी किल्ल्याचा भाग होती. १९ जानेवारी १९५६ रोजी केंद्र सरकारने ही जमीन १ लाख ७० हजार ९७९ रुपयांत मध्य प्रदेश सरकारच्या नावाने केली होती. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने ही जमीन सेंट्रल प्रोव्हिन्स ट्रान्सपोर्ट सर्व्हिसला विकली. २१ मे १९६२ रोजी सर्व्हिसच्या जागेवर मध्य प्रदेश मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे ही जमीन महामंडळाची मालमत्ता झाली. तेव्हापासून ही जमीन महामंडळाच्या ताब्यात व वापरात असून येथील बसस्थानकावरून महामंडळाच्या ९३ बसेस चालतात. २४ डिसेंबर २०१८ रोजी भूमी अभिलेख अधीक्षकांनी ही नझुलची जमीन असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे १९ जानेवारी २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी महामंडळाला नोटीस बजावून सात दिवसात जमीन रिकामी करण्याचा आदेश दिला. त्यावर महामंडळाचा आक्षेप आहे. न्यायालयात याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रोहण छाबरा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर