शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र अधिकाऱ्यांनी वाचवले अनेकांचे प्राण

By admin | Updated: May 14, 2016 03:05 IST

देशातील महत्त्वाचा धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सव असलेला सिंहस्थ कुंभमेळा सध्या उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठावर सुरू आहे.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र : सिंहस्थ कुंभमेळानागपूर : देशातील महत्त्वाचा धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सव असलेला सिंहस्थ कुंभमेळा सध्या उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठावर सुरू आहे. या पर्वावर सांस्कृतिक चेतना निर्माण करण्यासाठी संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि मध्यप्रदेश शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाची जबाबदारी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राकडे देण्यात आली असून उज्जैन येथे जोरदार वादळी पाऊस आला. यामुळे तेथे बांधलेले तंबू आणि शामियाना कोसळला. वादळामुळे शामियानावरील टिना उडल्या. यात आठ नागरिकांना प्राण गमवावा लागला. अशावेळी अधिक हानी होऊ नये म्हणून केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जीवावर उदार होत अनेकांचे प्राण वाचविले. गढकालिका मंदिराजवळील विक्रमादित्य मंचावर सांस्कृतिक कार्यक्रमांसह राष्ट्रीय चित्रकारांचेही सादरीकरण सुरू असताना अचानक वादळी पाऊस आला. याप्रसंगी ५० ते ६० राष्ट्रीय चित्रकार शामियानात होते. वादळामुळे टिना उडत होत्या आणि शामियाना कोसळत होता. पावसाने रौद्र रूप धारण केले. यावेळी कोसळलेल्या शामियानाखाली अनेक कलावंत दबले. दुर्घटनास्थळावर केंद्राचे अधिकारी दीपक कुळकर्णी, गोपाल बेतावार, दीपक पाटील, शशांक दंडे, अनिल ठाकरे, प्रवीण, सूरज, नीलेश, डेव्हीड, गणपत, प्रजापती आदींनी प्रयत्न करून दबलेल्या कलावंताना बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविले. वाहनचालक योगेश श्रीरामे एका उडत्या टिनने जखमी झाले पण तरीही त्यांनी कलावंतांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी पुढाकार घेतला. मध्यप्रदेश शासनाच्या कर्मचाऱ्यांनीही या कामात सहकार्य केले. मध्यप्रदेश सरकारने या गंभीर वादळाची दखल घेत तीन दिवस सर्व कार्यक्रम स्थगित केले होते. केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या समयसूचकतेमुळे अनेक कलावंतांना सुरक्षित राहिले. याबाबत केंद्र अधिकाऱ्यांची प्रशंसा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)