शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळेल का केंद्राचे बूस्ट ?

By admin | Updated: June 4, 2017 01:47 IST

किसान क्रांतीच्या झेंड्याखाली विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग शनिवारी रात्री नागपुरात दाखल झाले.

संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री नागपुरात : आज शेतकरी मेळावा लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : किसान क्रांतीच्या झेंड्याखाली विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग शनिवारी रात्री नागपुरात दाखल झाले. रविवारी विविध बैठका घेऊन ते दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर ते शेतकऱ्यांना दिलासा देणारी काही घोषणा करतील का, याकडे शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. किसान क्रांतीच्या झेंड्याखाली शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शुक्रवारी रात्री मुंबईत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा झाली. मात्र, दिवसभरातील घटनाक्रमात आंदोलकांमध्येच दोन गट पडल्याचे पहायला मिळाले. एका गटाने संप मागे घेणार नसून सुरूच ठेवणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली. या संपाला विविध संघटना व राजकीय पक्षांचाही वाढता पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होत असताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग शनिवारी रात्री नागपुरात दाखल झाले. रविवारी दुपारी १२.३० वाजता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठाची संयुक्त बैठक रविभवन येथे होत आहे. या बैठकीला ते उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता देशपांडे सभागृहात शासकीय दूध योजना व राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाद्वारा संचालिक मदर डेअरीच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. येथेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा होईल. शेतकरी मेळावा होणार आहे. या सर्व बैठकांना व कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर हे देखील यावेळी उपस्थित राहतील.हे सर्वच कार्यक्रम कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे या कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषी क्षेत्राशी संबंधित काही घोषणा करतील, काही धोरणात्मक वक्तव्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.