शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आयकर आयुक्तांकडे सीबीआयची धाड

By admin | Updated: May 30, 2015 02:54 IST

मुंबईच्या सीबीआय पथकाने सेमिनरी हिल्स सीपीडब्ल्यूडी क्वॉर्टर येथील एका आयकर आयुक्ताचे (अपील) शासकीय निवासस्थान त्यांच्या अनुपस्थितीत सील केल्याची माहिती आहे.

सीबीआयने निवासस्थान केले सील : मुंबई पथकाची कारवाईनागपूर : मुंबईच्या सीबीआय पथकाने सेमिनरी हिल्स सीपीडब्ल्यूडी क्वॉर्टर येथील एका आयकर आयुक्ताचे (अपील) शासकीय निवासस्थान त्यांच्या अनुपस्थितीत सील केल्याची माहिती आहे. ते अभ्यास रजा घेऊन लंडन येथे गेल्याचे कळते. सीबीआयच्या नागपूर कार्यालयाने अशी कोणती कारवाई केल्याचा इन्कार केला आहे. मात्र अशी कारवाई झाल्याचे आयकर विभागाच्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. सदर आयकर आयुक्तांची गत वर्षीच मुंबईहून नागपुरात बदली करण्यात आली. ते सीपीडब्ल्यूडी क्वॉर्टर येथे एकटेच राहतात. त्यांनी आपले कुटुंब आणलेले नाही. मुंबई येथे एका जुन्या आयकर अपील प्रकरणात त्यांनी अपीलकर्त्याच्या बाजूने काम केल्यामुळे सीबीआयने त्यांची चौकशी प्रारंभ केली. चौकशी दरम्यान त्यांची नागपुरात बदली करण्यात आली, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच चार जणांचे मुंबई सीबीआयचे पथक नागपुरात आले. त्यांच्या निवासस्थानाची झडती घेऊन जप्ती करण्याच्या हेतूने हे पथक सीपीडब्ल्यूडी क्वॉर्टर येथे धडकले होते. परंतु ते लंडन येथे गेल्याचे समजताच त्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानाला सील ठोकले. लागलीच हे पथक मुंबईकडे रवाना झाले, असेही या सूत्रांकडून सांगण्यात आले.