शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

एचपीसीएल कार्यालयात सीबीआयची तपासणी

By admin | Updated: July 16, 2014 01:18 IST

भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून हिंदुस्थान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) च्या प्रादेशिक कार्यालयात आज सीबीआयच्या पथकाने प्रदीर्घ तपासणी आणि चौकशी केली. या चौकशीतून सीबीआयच्या

नागपूर : भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून हिंदुस्थान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) च्या प्रादेशिक कार्यालयात आज सीबीआयच्या पथकाने प्रदीर्घ तपासणी आणि चौकशी केली. या चौकशीतून सीबीआयच्या हाती नेमके काय लागले, ते मात्र रात्रीपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. एचपीसीएलच्या भ्रष्टाचाराच्या सीबीआयकडे अनेक तक्रारी होत्या. त्याची शहानिशा केल्यानंतर सीबीआयच्या स्थानिक युनिटने सीबीआय मुख्यालयातून चौकशीची परवानगी मिळवली. त्यानंतर आज सकाळी सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे यांच्या नेतृत्वात सीबीआयच्या पथकाने कस्तुरचंद पार्कजवळच्या (एलआयसी चौकानजिक) एचपीसीएलच्या प्रादेशिक कार्यालयात धडक दिली. सकाळपासून तपासणी पथकाने कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली. तपासणीनंतर सीबीआच्या पथकाने काही कागदपत्रे ताब्यात घेतली आणि एचपीसीएलच्या काही अधिकाऱ्यांची जबानीही नोंदविल्याची माहिती आहे. चौकशीदरम्यान सीबीआयच्या पथकासोबतच एचपीसीएलचे सतर्कता पथकही असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, त्याला दुजोरा मिळू शकला नाही.विस्तृत माहितीसाठी एचपीसीएलच्या कार्यालयात तेथील भारद्वाज नामक अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष, तसेच टी. राजेश यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले. त्यामुळे नेमकी काय अन कशासाठी चौकशी झाली, ते स्पष्ट झाले नाही. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. मात्र, चौकशी सुरू आहे, त्यामुळे जास्त काही बोलणे योग्य नाही, असे सांगितले. (प्रतिनिधी)