गुरांच्या अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:49+5:302021-04-07T04:08:49+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा पाेलिसांनी माैदा-रामटेक मार्गावरील तारसा (ता. माैदा) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ...

Caught a truck transporting cattle illegally | गुरांच्या अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला

गुरांच्या अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा पाेलिसांनी माैदा-रामटेक मार्गावरील तारसा (ता. माैदा) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात ट्रकचालक पळून गेल्याने क्लीनरला अटक करण्यात आली असून, ट्रकमधील २० जनावरांची सुटका करण्यात आली तसेच एकूण १४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. ४) रात्री ११.५५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

राहुल राजेश खन्ना (२७, रा. मच्छीपुरा, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. माैदा पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना माैदा-रामटेक मार्गावरून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या मार्गाची पाहणी केली. शिवाय, तारसा शिवारातील नाल्याजवळ नाकाबंदी करून वाहनांची तपासणीही सुरू केली. पाेलिसांनी एमएच-४०/बीएल-५४९८ क्रमांकाचा ट्रक थांबवला. त्या धावपळीत ट्रकचालकाने अंधाराचा फायदा घेत ट्रक साेडून पळ काढला. पाेलिसांनी या ट्रकची झडती घेतली असता, त्यात त्यांना २० जनावरे काेंबली असल्याचे आढळून आले.

ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ती सर्व जनावरे कामठी शहरातील कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रकमधील क्लीनरला अटक केली आणि जनावरांची सुटका करीत ट्रक जप्त केला. या कारवाईमध्ये १२ लाख रुपयांचा ट्रक आणि दाेन लाख रुपये किमतीची जनावरे असा एकूण १४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली असून, पळून गेलेल्या आराेपींना लवकरच अटक केली जाणार असल्याचे सांगितले. या ट्रकमधील गुरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक नितीन आगाशे, निशांत मेश्राम, नितीन सार्वे, शिवा नागरे यांच्या पथकाने केली.

Web Title: Caught a truck transporting cattle illegally