काेराेनाला हद्दपार करण्यासाठी लस आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:51+5:302021-04-07T04:08:51+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : काेराेना महामारीची दुसरी लाट राज्यात आली असून, काेराेनाबांधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाने शासकीय ...

Carina needs a vaccine to get rid of it | काेराेनाला हद्दपार करण्यासाठी लस आवश्यक

काेराेनाला हद्दपार करण्यासाठी लस आवश्यक

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : काेराेना महामारीची दुसरी लाट राज्यात आली असून, काेराेनाबांधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाने शासकीय आराेग्य केंद्र तसेच खासगी हाॅस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरू केले आहे. ही लस पूर्णत: सुरक्षित असल्याने नागरिकांनी या लसीबाबत शंकाकुशंका न बाळगता काेराेनाला हद्दपार करण्यासाठी ही लस घ्यावी, असे आवाहन वेल्ट्रीट हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. राहुल ठवरे यांनी केले.

वाडीतील वेल्ट्रीट हाॅस्पिटलमध्ये नुकतेच काेविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. वाडी शहर तसेच परिसरातील ऑनलाईन अथवा ऑफलाईन नाेंदणी करणाऱ्या नागरिकांना त्वरित लसीकरण करण्यात येत आहे. येथील केंद्रात नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे डाॅ. राहुल ठवरे यांनी सांगितले. याठिकाणी डाॅ. काैस्तुभ वंजारी, डाॅ. राजेश रवांधे, डाॅ. अश्विनी ठवरे, डाॅ. प्रशांत नागलवडे, बिपीन समर्थ, शाेएब शेख, तुमेंद्र चव्हाण आदींची चमू जबाबदारी सांभाळत आहे.

Web Title: Carina needs a vaccine to get rid of it