शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
3
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
4
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
5
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
6
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
7
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
8
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
9
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
10
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
11
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
12
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
14
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
15
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
16
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
17
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी पैशाची उधळपट्टी अधिकारी चालवितात कॅन्टिन

By admin | Updated: April 27, 2016 03:10 IST

केंद्र व राज्याच्या सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांअभावी कामे रखडत असल्याची नेहमीची बोंब आहे.

महालेखाकार कार्यालयात अजब प्रकार : माहिती अधिकारात बाब उघडनागपूर : केंद्र व राज्याच्या सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांअभावी कामे रखडत असल्याची नेहमीची बोंब आहे. पण सिव्हिल लाईन्स येथील महालेखाकार (लेखा व हकदारी) कार्यालयात अधिकारी व कर्मचारी एवढे अतिरिक्त आहेत की त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागाच्या कॅन्टिनच्या कामात जुंपले आहे. महिन्याला ४१ रुपयांचा तोटा होणाऱ्या कॅन्टिनमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर सरकार महिन्याकाठी ३ लाख २८ हजार ५५८ रुपयांचा खर्च करीत असल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.कॅन्टिनमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना ३.२८ लाख पगारकॅन्टिनमध्ये कार्यरत आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च सरकारी तिजोरीतून केला जातो. फेब्रुवारी महिन्यात त्यांना ३ लाख २८ हजार ५५८ रुपये वेतन देण्यात आले. त्या तुलनेत कॅन्टिनला ४१ रुपयांचा तोटा झाला. कार्यालयात वरिष्ठ अकाऊटंट पदावर कार्यरत असलेल्या एन.सी. मरियन यांच्याकडे कॅन्टिन व्यवस्थापकाची जबाबदारी असून दुसरे वरिष्ठ अकाऊटंट बी.एस. हेडाऊ हे कॅन्टिनचा लेखाजोखा सांभाळतात. एच.व्ही. भगत हे हलवाई आहेत. डी.एल. धावने हे सहायक हलवाई असून एस.सी. कांबळे हे चहा बनवितात. अन्य कर्मचारी आर.जे. मसराज आणि ओ.एम. ढाकुलकर हे बेरर म्हणून काम पाहतात. कार्यालयात अकाऊटंट पदावर कार्यरत एस.एच. नगरारे हे कॅश काऊंटरची जबाबदारी सांभाळतात. कदाचित शिक्षा म्हणून त्यांना कॅन्टिनमध्ये नियुक्त केल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्टिनचे कामकाज अधिकारी व कर्मचारी सांभाळीत आहे. आतापर्यंत झालेल्या कोट्यवधींच्या सरकारी खर्चाची भरपाई कोण करणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. बाहेरील हलवाई करू शकतात कॅन्टिनचे संचालनमहालेखाकार कार्यालयातील हॉलमध्ये कॅन्टिनचे संचालन करण्यात येते. हॉलचे भाडे घेण्यात येत नाही, शिवाय वीज, पाणी, फर्निचर, दुरुस्ती, भांडे आणि पोषाख शासकीय निधीतून पुरविला जातो. त्यानंतरही फेब्रुवारीमध्ये कॅन्टिनला ४१ रुपयांचा तोटा झाला आहे. हे कॅन्टिन बाहेरील हलवाई कंत्राटीवर नफ्यात चालवू शकतो. त्यामुळे सरकारचा त्यांच्या वेतनावर होणारा खर्च वाचेल आणि कर्मचाऱ्यांची टंचाई न जाणवता सरकारी कामकाज वेळेत पूर्ण होऊ शकते. कॅन्टिनमध्ये विक्री १.९३ लाख!सरकारी अधिकारी व कर्मचारी कॅन्टिन चालवित असेल तर त्यांचे वेतन कॅन्टिनचे संचालन करताना होणाऱ्या नफ्यातून निघाले पाहिजे. त्यांच्या पगाराच्या तुलनेत विक्री केवळ १ लाख ९३ हजार ३६० रुपयांची आहे. अशात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात आहे.