शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची कॅन्सर जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

गुरुवारी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., महापालिकेचे अप्पर आयुक्त राम जोशी, अप्पर आयुक्त संजय निपाणे, उपद्रव शोध पथकाचे ...

गुरुवारी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., महापालिकेचे अप्पर आयुक्त राम जोशी, अप्पर आयुक्त संजय निपाणे, उपद्रव शोध पथकाचे जवान, डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आकाशवाणी चौकापासून महापालिका मुख्यालयापर्यंत सायकल रॅली काढली. रॅलीत उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. संजय चिलकर, सहायक आयुक्त महेश धामेचा, डॉ. विजय जोशी, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, उपद्रव शोध पधकाचे प्रमुख वीरसेन तांबे, नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. सुहास चौधरी, ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रोशन जेकब, डॉ. धनंजय बोकारे आणि डॉ. अंकिता उपाध्याय यांनी भाग घेतला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले की, कॅन्सरप्रति मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या जीवनशैलीकडे लक्ष पुरवावे. तंबाखू, मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. अप्पर आयुक्त राम जोशी म्हणाले, महिन्यातून एक वेळा सायकलने कार्यालयात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक कॅन्सर दिनानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी पुन्हा एकदा सायकलने कार्यालयात आले आहेत. कॅन्सर या आजाराकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. डॉ. जेकब यांनी ‘आय अ‍ॅम, आय विल’ ही या वर्षी कॅन्सर दिनाची संकल्पना असल्याचे सांगून सुरुवातीच्या काळात कॅन्सरचे निदान झाल्यास कॅन्सरपासून बचाव करणे शक्य होत असल्याची माहिती दिली.

...............