शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कॉ. पानसरेंच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करा

By admin | Updated: February 22, 2015 02:30 IST

प्रतिगामीवाद्यांनी सुपारी देऊन कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला केल्याचा आरोप करून त्यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी

नागपूर : प्रतिगामीवाद्यांनी सुपारी देऊन कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला केल्याचा आरोप करून त्यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी व्हेरायटी चौकात आयोजित निषेध सभेत करण्यात आली. आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून व्हेरायटी चौकात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जोरदार नारेबाजी केली. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी व्हेरायटी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई), रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया सेक्युलर, संयुक्त जनता दल, अखिल भारतीय शिक्षा अधिकार मंच, सत्यशोधक शिक्षक सभा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जनसंघर्ष मंच, भारिप बहुजन महासंघ, प्रोग्रेसिव्ह लायर्स फोरम, रिपब्लिकन पँथर, प्रगतिशील लेखक संघ आदी पक्ष आणि संघटनांचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी गोविंदराव पानसरेंवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून जोरदार घोषणाबाजी केली. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचे आरोपी अद्याप मोकाट असून पानसरेंवरील हल्ल्याचे आरोपीही सापडले नसल्यामुळे हे शासनाचे अपयश असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी बोलताना अरुण लाटकर यांनी पुरोगामी माणसाने विचार मांडावेत की नाही, असा प्रश्न उपस्थित करून रविवारी नागपूर बंदचे आवाहन केले. मोहनदास नायडु यांनी शासनाने मारेकऱ्यांना त्वरित अटक करून या हत्येमागील विचारधारा उघड करण्याची मागणी केली. ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम यांनी परिवर्तनवादी चळवळीच्या नायकाचा यातनादायी मृत्यू संतापजनक असल्याचे सांगून ही वेळ स्पष्ट भूमिका घेऊन दुष्ट प्रवृत्ती ठेचून काढण्याची असल्याचे मत व्यक्त केले. माजी आमदार एस. क्यु. जमा यांनी पानसरेंवरील हल्ला शरमेची बाब असून पानसरेंची लढाई पुढे नेण्याचे आवाहन केले. यावेळी मोहनदास नायडु, बाळ अलोणी, गीता महाजन, सुनील शेंडे, सुधाकर वाघुके, रवि टेंभुर्णे, अमृत मेश्राम, भीमराव खोब्रागडे, अरुण लाटकर, मनोहर मुळे, अरुण वनकर, बलवंतराय मेहता, परसराम राऊत, नरेंद्र पलांदूरकर, संजीवन वालदे, प्रकाश कुंभरे, दिनेश गोडघाटे, अशोक सरस्वती, दिनेश अंडरसहारे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)