शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:17 IST

नागपूर : एसटी बसेसची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रवासी मोठ्या संख्येने एसटी बसने ...

नागपूर : एसटी बसेसची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रवासी मोठ्या संख्येने एसटी बसने प्रवास करीत आहेत. परंतु, पूर्वीसारख्या ग्रामीण भागात मुक्कामाला जाणाऱ्या बहुतांश बसेस बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे.

शहरी भागात जाणाऱ्या बसेस फुल्ल

- सध्या नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकावरून शहरी भागात जाणाऱ्या बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. शहरी भागात गणेशपेठ बसस्थानकावरून १२ हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ग्रामीण भागातील बसेसमध्ये जागा मिळेना

-गणेशपेठ बसस्थानकावरून ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसमध्ये कमालीची गर्दी होत आहे. अनेकदा प्रवाशांना जागाही मिळत नसल्याची स्थिती आहे. गणेशपेठ बसस्थानकावरून ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसमध्ये दररोज १८ हजार प्रवासी प्रवास करीत असल्याचे एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी सांगितले.

मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांचे काय ?

- सध्या नागपुरातील गणेशपेठ आगारातून रात्री मुक्कामी जाणाऱ्या बहुतांश बसेस बंद आहेत. यात गुमगाव, टाकळघाट, लोधीखेडा, मोहगाव, छिंदवाडा, सिवनी, आंभोरा, मांढळ, बेला, लोहगड येथे रात्री मुक्कामी जाणाऱ्या बसेस बंद आहेत. त्यामुळे या बसेस कधी सुरू होणार याची विचारणा प्रवासी करीत आहेत.

सकाळीच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय

‘मागील अनेक वर्षांपासून बेला गावात एसटी बस मुक्कामी येत होती. परंतु, मागील दीड वर्षांपासून ही बस बंद झाली आहे. सकाळीच गावातील अनेक नागरिकांना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. परंतु, बसच मुक्कामी येत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.’

- नरेश सोमकुवर, प्रवासी बेला

खासगी वाहनाने जावे लागते

‘मुक्कामी बस येत नसल्यामुळे सकाळीच नागपुरात येण्यासाठी खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी गावात मुक्कामी बस थांबणे आवश्यक आहे.’

- प्रशांत राठोड, प्रवासी आंभोरा

शाळा सुरू झाल्यानंतर मुक्कामी बसेस सुरू करू

‘सध्या विद्यार्थी फेऱ्या बंद आहेत. शाळा, महाविद्यालये पूर्णपणे सुरू झालेले नाहीत. ते सुरू होताच नाईट आऊट बसेस सुरू करण्यात येतील.

- अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगार

............