माजी आमदाराच्या नातेवाइकांकडे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST2021-03-07T04:08:26+5:302021-03-07T04:08:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील देवरीचे माजी आमदार संजय पुराम यांच्या नागपुरातील नातेवाइकांच्या निवासस्थानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ...

Burglary to relatives of former MLA | माजी आमदाराच्या नातेवाइकांकडे घरफोडी

माजी आमदाराच्या नातेवाइकांकडे घरफोडी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील देवरीचे माजी आमदार संजय पुराम यांच्या नागपुरातील नातेवाइकांच्या निवासस्थानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख आणि दागिने असा एकूण पावणेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

माजी आमदार पुराम यांचे मोठे वडील जनुभाऊ पुनाजी पुराम (वय ७२) हे बेलतरोडीतील गोंडवाना नगरात राहतात. ४ मार्चला ते आपल्या दाराला कुलूप लावून सहपरिवार गोंदियाला गेले होते. शुक्रवारी दुपारी परत आले असता त्यांना दाराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून कपाटात ठेवलेले रोख २५ हजार, घड्याळ आणि सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास केला. पुराम यांनी लगेच बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

----

कुख्यात सोनू हुंदल हद्दपार

नागपूर - कळमन्यातील कुख्यात गुन्हेगार सोनू ऊर्फ रवींद्रसिंग बलविंदरसिंग सोनू हुंदल (वय २६) याला नागपुरातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले. त्याला दुर्ग जिल्ह्यातील (छत्तीसगड) न्यू खुर्सापार (भिलाई) येथे त्याच्या काकाच्या घरी नेऊन सोडण्यात आले. परिमंडळ पाचचे उपायुक्त निलोत्पल यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.

----

Web Title: Burglary to relatives of former MLA