बंटी-बबलीने घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST2021-02-06T04:12:06+5:302021-02-06T04:12:06+5:30

हे दोघे सध्या विणकर वसाहतीत राहतात. ते पूर्वी कल्याणेश्वरनगरात (मानेवाडा, बेसा रोड) सुनंदा चित्तरंजन देशमुख (५८) यांच्याकडे भाड्याने राहत ...

Bunty-Babli put Ganda | बंटी-बबलीने घातला गंडा

बंटी-बबलीने घातला गंडा

हे दोघे सध्या विणकर वसाहतीत राहतात. ते पूर्वी कल्याणेश्वरनगरात (मानेवाडा, बेसा रोड) सुनंदा चित्तरंजन देशमुख (५८) यांच्याकडे भाड्याने राहत होते. त्यांनी त्या ओळखीचा फायदा उठवत देशमुख यांना ३ फेब्रुवारी २०१३ रोजी शेती, तसेच शेळीपालनाच्या व्यवसायात बक्कळ लाभ मिळत असल्याची थाप मारली. तुम्हाला अल्पावधीतच लाखोंचा लाभ होईल, असे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले. त्यानंतर लाभाचे सोडा; मूळ रक्कमही परत केली नाही. वेळोवेळी वेगवेगळे कारण सांगून आरोपी देशमुख यांना टाळत होते. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने देशमुख यांनी अजनी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपी पूनमला ताब्यात घेतले. प्रवीण फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पूनम आणि प्रवीण हे दोघे स्वत:ला पत्रकार म्हणवून घेत लोकांची फसवणूक करीत होते.

....................................

Web Title: Bunty-Babli put Ganda