विजेच्या धक्क्याने बैलजाेडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST2021-06-19T04:07:30+5:302021-06-19T04:07:30+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : बैलगाडीने शेतात जात असताना आंब्याच्या झाडाची माेठी फांदी विजेच्या तारांवर पडली आणि त्या जिवंत ...

Bulldog dies of electric shock | विजेच्या धक्क्याने बैलजाेडीचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने बैलजाेडीचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : बैलगाडीने शेतात जात असताना आंब्याच्या झाडाची माेठी फांदी विजेच्या तारांवर पडली आणि त्या जिवंत तारा तुटून बैलगाडीला जुंपलेल्या दाेन्ही बैलांच्या अंगावर पडल्या. हा प्रकार लक्षात येताच शेतकरी व त्याच्या सातवर्षीय मुलाने बैलांना स्पर्श करण्याऐवजी बैलगाडीतून उडी मारली व बाजूला झाले. यात विजेच्या धक्क्याने दाेन्ही बैलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील साेनमाेह शिवारात शुक्रवारी (दि. १८) सकाळी घडली.

बलराम भाेयर (४०, रा. काेंढासावळी, ता. काटाेल) यांची साेनमाेह, ता. काटाेल शिवारात शेती आहे. ते व त्यांचा मुलगा शिव बलराम भाेयर (७) बैलगाडीने नेहमीप्रमाणे शेतात जात हाेते. साेनमाेह शिवारातील नदीजवळ पाेहाेचताच आंब्याच्या झाडाची माेठी फांदी विजेच्या तारांवर काेसळली. त्यामुळे तारा तुटल्या. या तारा रस्त्याला आडव्या गेल्या असल्याने त्या थेट बैलगाडीला जुंपलेल्या दाेन्ही बैलांच्या अंगावर पडल्या.

त्यामुळे त्यांना जाेरात विजेचा धक्का लागला आणि काही वेळात घटनास्थळी दाेन्ही बैलांचा मृत्यू झाला. बैलांच्या अंगावर विजेच्या तारा पडल्या असल्याचे लक्षात येताच बलराम यांनी प्रसंगावधान बाळगत शिवला साेबत घेऊन तारांच्या विरुद्ध दिशेने बैलगाडीतून उडी मारली व बाजूला झाले. माहिती मिळताच महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेत ऐन खरीप हंगामाच्या ताेंडावर बैलजाेडी मृत्युमुखी पडल्याने महावितरण कंपनी व शासनाने बलराम यांना याेग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिाकांनी केली आहे.

Web Title: Bulldog dies of electric shock