शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

बलम तू...देसी मुसामी...प्राजक्ताच्या गाण्यांची ‘धमाल’

By admin | Updated: June 1, 2015 02:46 IST

डीजेच्या तालावर गुणी गायिका प्राजक्ता मानकरच्या सुरेल गाण्यांनी ‘धमाल गल्ली’ला प्रारंभ करण्यात आला.

डीजेच्या तालावर गुणी गायिका प्राजक्ता मानकरच्या सुरेल गाण्यांनी ‘धमाल गल्ली’ला प्रारंभ करण्यात आला. आर. जे. राजन यांनीही आपल्या खास अंदाजात तरुणाईला बांधून ठेवले. डान्स मॅडनेस क्लबचे इन्स्ट्रक्टर माधव वैद्य यांनी झुंबा डान्सच्या माध्यमातून फिटनेसचे प्रात्यक्षिके दाखवित ते करवूनही घेतले.कसरत अन् छंद‘ड्रोन’ची कसरत, गिटारवादन, अंगाभोवती रिंग फिरविणे, एक टप्पा क्रि केट, सेल्फीचा आनंद, क्ले-आर्ट, भोवरा, कंचे असे एक ना अनेक खेळ, उपक्र म उपस्थितांना छंद पाहायला आणि प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळाले. आज उत्साहाच्या भरात काही युवकांनी तर कमालच केली. ड्रोनवर उंच असलेल्या चक्क क्रॉसबारवर दोरीच्या साहाय्याने जात उंचावर दंड मारण्याचा प्रकार युवकांनी केला. त्यांच्या या साहसाला उपस्थितांनीही दाद दिली. उड्या, मस्ती, डान्सने धमाल गल्ली रंगली. प्रामुख्याने माधुरी चौरसिया यांच्या मेंदीच्या कलात्मकतेवर युवती, महिला खूश झाल्या. अनेकींची हातावर मेंदी काढून घेण्यासाठी धडपड अखेरपर्यंत सुरू होती. बलून उडविणाऱ्या पिचकाऱ्या, एअर बलूनला मागणीधमाल गल्लीत असंख्य नागरिक आपल्या चिमुकल्यांना घेऊन आले होते. त्यामुळे बालकांचा कल पाहून बलून हवेत उडविणाऱ्या पिचकाऱ्या आणि हवेत उडणारे फुगे विक्रेत्यांनी उपलब्ध करून दिले होते. असंख्य बालक ही पिचकारी आणि हवेत उडणारे फुगे घेऊन मागण्यासाठी आपल्या पालकांकडे हट्ट करताना दिसले.गेट नाऊ डॉट अ‍ॅटने आणली रंगतधमाल गल्लीत गेट नाऊ डॉट अ‍ॅट या कंपनीने चांगलीच रंगत आणली कंपनीने धमाल गल्लीत उपस्थितांसाठी लकी ड्रॉचे आयोजन केले होते. यात कंपनीच्या कुपनवर आवश्यक ती माहिती भरून बॉक्समध्ये टाकावयाची होती. त्यानंतर लकी ड्रॉ काढून पहिले पारितोषिक नयासाचा बाथसेट, दुसरे पारितोषिक बजान आयरन आणि तिसरे पारितोषिक सॅनडिस्कचा पेनड्राईव्ह देण्यात येणार आहे. कंपनीने एका ट्रॉलीरेसचे आयोजन केले होते. यात मैदानावर विविध ठिकाणी कंपनीचे प्रोडक्ट ठेवले होते. स्पर्धकांना ट्रॉली घेऊन त्या ठिकाणी जाऊन सर्व प्रोडक्ट जमा करायचे होते. सर्वात आधी प्रोडक्ट घेऊन येणाऱ्या १० स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मेकअप अन् मेहंदीसाठी गर्दीधमाल गल्लीत मधु ब्युटी पार्लरच्या माधुरी चौरसिया यांनी महिला आणि युवतींना नि:शुल्क हेअर स्टाईल अन् मेहंदी काढून दिली. यामुळे त्यांच्या स्टॉलवर महिला आणि युवतींनी एकच गर्दी केली होती. अनेक महिलांनी आपली हेअर स्टाईल सेट करून घेतली. सुषमा भुरे आणि सुनिता सावडिया यांनी शेकडो महिला, युवतींच्या हातावर नक्षीदार मेहंदी काढली.