शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसाठी चौकाच्या मध्यभागी ट्रॅफिक बूथ बांधा : हायकोर्टाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:27 IST

सिग्नलवर वाहतूक पोलीस दिसत नाहीत. ते रस्त्याच्या बाजूला झाडाखाली उभे असतात. तेव्हा वाहतूक पोलिसांसाठी चौकाच्या मध्यभागी ट्रॅफिक बूथ बांधण्यात यावा आणि त्या ठिकाणाहूनच पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.

ठळक मुद्देनियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिग्नलवर वाहतूक पोलीस दिसत नाहीत. ते रस्त्याच्या बाजूला झाडाखाली उभे असतात. तेव्हा वाहतूक पोलिसांसाठी चौकाच्या मध्यभागी ट्रॅफिक बूथ बांधण्यात यावा आणि त्या ठिकाणाहूनच पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.शहरातील वाहतूक समस्यांवर न्या. रवी देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी २२ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेल्या आदेशाची आठवण पोलीस आयुक्तांना करून दिली. सर्व वाहतूक पोलीस सिग्नलवर थांबणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते. त्या आदेशांचे पालन होताना दिसून येत नसल्याची खंत हायकोर्टाने पुन्हा एकदा व्यक्त केली. वाहतूक पोलीस रस्त्याच्या बाजूला झाडाखाली थांबलेले आढळतात. अनेकदा मोबाईलवर खेळत असतात अथवा संभाषण करीत असतात. वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होताना दिसून येत नाही, अशी टीकाही न्यायालयाने केली.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असताना त्यावर कुणीही कडक कारवाई का करीत नाही, अशी विचारणा हायकोर्टाने पूर्वी केली होती. पार्किंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन, रस्त्यावरील मोकाट जनावरे यासारख्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.दरम्यान, वाहतूक नियमांचा भंग केल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती हायकोर्टात सादर करण्यात आली. त्यानुसार जानेवारी ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत १३ हजार ४५९ जणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली आहे तर वाहतुकीचे नियम तोडले म्हणून जानेवारी ते जुलै या कालावधीत ७४ हजार ७३३ जणांवर कारवाई केलेली आहे. तेव्हा पोलीस आयुक्तांनी वाहतूक विभागात केलेल्या कामाचे कौतुक खंडपीठाने केले. परंतु, नियम तोडणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्यात यावी, शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात यावा, असा आदेश न्यायमूर्तींनी दिला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयtraffic policeवाहतूक पोलीस