गजभियेंच्या प्रचारात बसपा सक्रिय

By Admin | Updated: June 16, 2014 01:10 IST2014-06-16T01:10:31+5:302014-06-16T01:10:31+5:30

देशात शिक्षणाची मुहूर्तमेढ शाहू-फुले-आंबेडकरांनी रोवली. परंतू आज फुले-शाहू-आंबेडकरांना मानणाऱ्या पदवीधरांपुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. या महापुरुषांच्या विचाराचा वारसा घेऊन समाजात

BSP active in campaigning of Gajbians | गजभियेंच्या प्रचारात बसपा सक्रिय

गजभियेंच्या प्रचारात बसपा सक्रिय

सुरेश माने यांचे विजयाचे आवाहन
नागपूर : देशात शिक्षणाची मुहूर्तमेढ शाहू-फुले-आंबेडकरांनी रोवली. परंतू आज फुले-शाहू-आंबेडकरांना मानणाऱ्या पदवीधरांपुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. या महापुरुषांच्या विचाराचा वारसा घेऊन समाजात प्रामाणिकपणे काम करणारे माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना दलित, आदिवासी, बहुजन व अल्पसंख्यांक समाजातील पदवीधरांनी विजयी करावे, असे आवाहन बसपाचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सुरेश माने यांनी केले. याशिवाय गजभिये यांच्या प्रचारात बसपा सक्रिय झाली आहे.
डॉ. माने यांनी चंद्रमणी नगरात सभा घेऊन, गजभिये यांच्या विजयासाठी बहुजन समाजाला आवाहन केले. केंद्रात भाजपाप्रणित सरकार निवडून आले आहे. त्यांनी स्वतंत्र विदर्भ घोषित करून आपल्या वचनाची पूर्तता करावी, असेही माने म्हणाले. या जाहीर सभेला ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप ढोबळे, बसपा प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, हरीश बेलेकर, नाना देवगडे, भाऊ गोंडाणे, उत्तम शेवडे, विश्वास राऊत, नीरज गुजर, नगरसेवक किशोर गजभिये, सत्यभामा लोखंडे, अजय डांगे, वर्षा गजभिये, छाया कुरडकर, उषा बौद्ध, दौलत पुनवटकर, संपत रामटेके, आशीष शेंडे आदी उपस्थित होते. इकडे गजभिये यांच्या तगड्या उमेदवारीमुळे नागपूर पदवीधर मतदार संघात यावेळी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी वर्धा जिल्ह्यात झालेल्या प्रचारसभेत गजभिये यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी एकसंघ होण्याचे आवाहन, ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी केले. यावेळी फॉरवर्ड ब्लॉकचे अरुण बनकर, एल.टी.लव्हात्रे, ओबीसी सेवा संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: BSP active in campaigning of Gajbians