शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचे काम करण्यासाठी आलेल्या महिला व मुलीची निर्घृण हत्या; आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 22:37 IST

Nagpur News कळमेश्वर- झुणकी रोडवरील शेतामध्ये एका महिलेचा गळा आवळून तर मुलीचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.

नागपूर: कळमेश्वर- झुणकी रोडवरील शेतामध्ये एका महिलेचा गळा आवळून तर मुलीचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. मृत महिला आणि मुलीची ओ?ळख अद्यापही पटलेली नाही. याशिवाय हत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.कळमेश्वर झुनकी रोडवर श्रावण घोडपागे रा.नागपूर यांचे शेत आहे. हे शेत त्यांनी कळमेश्वर येथील ललित गजानन गणोरकर यांना ठेका पद्धतीने दिले आहे. दोन-तीन दिवसापूर्वी ३० वर्षीय महिला आणि दहा वर्षीय मुलीसह एक इसम ललित गणोरकर यांना त्यांच्या शेतामध्ये काम मागण्यासाठी आला होता. यावर गणोरकर यांनी त्याला वर्षभर काम करणार असेल तर काम देतो असे सांगितले होते. यावर त्याने एक-दोन दिवस राहतो असे सांगत शेतातील झोपडीत आसरा मागितला.सोमवारी दुपारी ललित गणोरकर हे शेतात आले असता झोपडीमध्ये त्यांना महिला आणि मुलगी मृतावस्थेत आढळून आली. त्यांच्यासोबत असलेला व्यक्ती शेतात दिसून आला नसल्याने गणोरकर यांनी लगेच कळमेश्वर पोलिसांनी यांना या घटनेची माहिती कळविली. लागलीच कळमेश्वर पोलीस येथे दाखल झाले. यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर, ठाणेदार आसिफ रजा शेख, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे, उपनिरीक्षक शरद गायकवाड पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल पोहोचले.पोलिसांनी घटनास्थळावर निरीक्षण केले असता दगड, पावशी आणि दोरी असे साहित्य आढळून आले. महिलेचा गळा आवळून तर मुलीला दगडाने ठेचून मारल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आल्याचे माहिती पोलिसांनी दिली. हा गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक तसेच कळमेश्वर पोलिसांचे पथक रवाना झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी