शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बीआरएसपी समविचारी पक्षासोबत निवडणूक लढणार -डाॅ. सुरेश माने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 23:20 IST

बसपा-वंचितसोबत युतीचेही संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी) या निवडणुका समविचारी पक्षासोबतच लढवणार असल्याची माहिती बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. सुरेश माने यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली.डाॅ. सुरेश माने यांनी सांगितले की, भाजपप्रणित महायुती आणि काॅंग्रेसप्रणित महाआघाडी यांना वगळून समविचारी पक्षांसोबत आमची चर्चा सुरू आहे.

ज्या ठिकाणी सामंजस्य झाले तिथे मिळून आणि जिथे सामंजस्य झाले नाही तिथे पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे. सध्या नगरपरिषद व नगरपंचायतच्या निवडणुका आहेत. या निवडणुका आम्ही लढवणार आहोत. नागपूरबाबत विचार केला तर कामठी, कळमेश्वर, कन्हान, बहादुरा आदी काही भागांवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. याबाबत पक्षाच्या बैठकीतही निर्णय घेण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये बीआरएसपी, बसपा व वंचितने सोबतयेऊन विडणूक लढवावी अशा स्थानिक स्तरावरच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. कार्यकर्त्यांच्या या भावनेशी मी सहमत आहे. तसे झाले तर मी तयार आहे, असे सांगत त्यांनी बसपा व वंचितसोबत युतीचेही संकेत दिले.पत्रपरिषदेला लटारी मडावी, डाॅ. विनोद रंगारी उपस्थित होते.

- गडचिरोलीत आदिवासी जनचेतना महासंमेलन

बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बीआरएसपीतर्फे येत्या १५ व १६ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील राजीव गांधी सभागृह इंदिरा गांधी चौक येथे भारतीय आदिवासी परिषद आणि आदिवासी दलित एकदा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय परिषदेत आदिवासींशी संबंधित विविध विषयांवर देशभरातील तज्ज्ञ मंडळी विचार व्यक्त करतील. यावेळी डाॅ. सुरेश माने लिखीत आदिवासी शाेषण संघर्ष सरकारी नीती -दशा -दिशा आव्हाने या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल. या कार्यक्रमाची माहितीही यावेळी देण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : बीआरएसपी समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढणार: डॉ. सुरेश माने

Web Summary : बीआरएसपी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक समविचारी पक्षांसोबत लढणार, भाजप आणि काँग्रेस आघाडी वगळता. नागपूर जिल्ह्यातील कामठी भागात लक्ष केंद्रित. बसपा आणि वंचित सोबत युतीची शक्यता डॉ. माने यांनी दर्शविली. गडचिरोली येथे आदिवासी परिषदेचे आयोजन केले जाईल.