शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

दलालांची धरपकड

By admin | Updated: June 13, 2014 01:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने आकस्मिक भेट देऊन तेथील दलालांची धरपकड केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे केंद्रातील दलालांची पळापळ झाली.

सेतू केंद्रात विशेष पथकाची कारवाई : वकिलांचाही समावेश
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने आकस्मिक भेट देऊन तेथील दलालांची धरपकड केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे केंद्रातील दलालांची पळापळ झाली. त्यात काही वकिलांचाही समावेश होता. पथकाने तिघांना पकडले असून, त्यांना सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सेतू केंद्रात गर्दी वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेऊन बाहेरचे दलालही सक्रिय झाले आहेत. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या सूचनेनुसार आकस्मिक कारवाईसाठी चार विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते.
त्यांच्याकडे सेतू केंद्रातील वाईट प्रकारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गुरुवारी अधीक्षक राजेश पोहनकर यांच्या नेतृत्वाखालील चार जणांच्या पथकाने दुपारी सेतू केंद्राला भेट दिली. या पथकाला केंद्रात सात जणांकडे आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली. त्यांची तपासणी केली असता ते सेतू केंद्रातील कागदपत्रे असल्याची आढळून आली. तपासणी सुरू होताच केंद्रात पळापळ सुरू झाली. सातपैकी तीन जण पथकाच्या हाती लागले. त्यात पुरुषोत्तम हटवार, आशिष हांडे आणि सतीश माळी यांचा समावेश आहे. त्यांना सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. उर्वरितांनी कागदपत्रे टाकून पळ काढला. पथकाची कारवाई पुढच्या काळात रोज होणार असल्याचे पोहनकर यांनी सांगितले.
सेतू केंद्रात वकिलांचे काम काय?
सेतू केंद्रात वकिलांचे काम काय, असा सवाल प्रशासनाने केला आहे. वकिलांनी न्यायालयात जावे. मात्र ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सायकल स्टॅन्डवर बसतात. आकस्मिक तपासणीच्या वेळी त्यांच्याजवळ केंद्रातील कागदपत्रेही सापडली आहेत.
हा प्रकार गंभीर आहे. सायकल स्टॅन्डवर गेल्यावर तेथील दलाल नागरिकांना घेरून घेतात. विशेष म्हणजे केंद्रात आणि बाहेरही पोलीस तैनात असताना दलाल येथे सक्रिय आहेत.(प्रतिनिधी)