शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

गोधनी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्ममध्ये भेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

नागपूर : गोधनी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्ममध्ये भेग पडल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. परंतु त्याबाबत चौकशी करायचे सोडून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ...

नागपूर : गोधनी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्ममध्ये भेग पडल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. परंतु त्याबाबत चौकशी करायचे सोडून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे.

गोधनी रेल्वेस्थानकाची आदर्श रेल्वेस्थानक म्हणून विकास करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. गोधनी रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्ममध्ये भेग पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. रेल्वे प्रशासनाने त्यावर तपास करण्याचे आदेशही दिलेले नाहीत. आदर्श स्टेशन म्हणून निवड करण्यात आलेल्या गोधनी रेल्वेस्थानकावरील कामे कुचकामी असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. प्लॅटफार्म तयार करणाऱ्या कंपनीच्या प्रोप्रायटरने यास नियोजनाचा अभाव कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. याबाबत तत्कालीन कनिष्ठ अधिकाऱ्याच्या निर्देशावर काम केल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीच्या मते, पाईप चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आला आहे. यावर आरसीसीचे काम व्हायला हवे होते नाही तर पाईप आत टाकावयाचे होते. परंतु या कामाची माहिती कनिष्ठ अधिकाऱ्यांना होती तर असे काम का करण्यात आले, हा प्रश्न आहे. याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मोबाईल न उचलल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.

...........