शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रेन डेड’ रुग्णांची नोंदच नाही!

By admin | Updated: November 5, 2014 00:55 IST

खासगी आणि शासकीय इस्पितळांनी ब्रेनडेड झालेल्या रुग्णाची माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला (डीटीसीसी) कळविण्याचे बंधनकारक असताना आतापर्यंत या केंद्राला एकाही ‘ब्रेन डेड’ रुग्णाची

नागपूर : खासगी आणि शासकीय इस्पितळांनी ब्रेनडेड झालेल्या रुग्णाची माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला (डीटीसीसी) कळविण्याचे बंधनकारक असताना आतापर्यंत या केंद्राला एकाही ‘ब्रेन डेड’ रुग्णाची माहिती देण्यात आली नाही. यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत यातना सहन करत असलेले रुग्ण आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असलेले नातेवाईक अडचणीत आले आहेत.किडनी, यकृत, फुफ्फुस हे अवयव निकामी झाल्यानंतर कुठलेच उपचार शक्य नाहीत. यासाठी अवयव प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय आहे, परंतु समाजात आणि इस्पितळांमध्येही अवयव प्रत्यारोपणाविषयी उदासीनता असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांच्या स्वाक्षरीने ह्युमन आॅर्गन ट्रान्सप्लांट कायदा १९९४ नुसार १३ सप्टेंबर २०१२ रोजी नव्या नियमांचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यात ब्रेनडेड झालेल्या रुग्णाची माहिती डीटीसीसीला देणे बंधनकारक केले आहे. असे न केल्यास तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय नव्या आदेशात इस्पितळातील २५ खाटांचा नियम शिथिल करण्यात आला आहे. आता ज्या इस्पितळामध्ये अवयव प्रत्यारोपण केंद्रे नाहीत. परंतु ज्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि शस्त्रक्रिया कक्ष आहे त्या ठिकाणी आता नॉन आॅर्गन ट्रान्सप्लांट सेंटर ( एनओटीसी) म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. अशा इस्पितळांनी आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे, मात्र आतापर्यंत नागपुरातील एकाही इस्पितळाने तशी नोंदणी केलेली नाही. यामुळे ‘ब्रेनडेड’ रुग्ण असलातरी त्याच्या नातेवाईकांचे समुपदेशन करून अवयव काढणे अद्यापही शक्य झालेले नाही. उपराजधानीत अवयवदान चळवळ बाल्यावस्थेतच असल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)