शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

सुनील भाटियाकडून बुकी बाजारातील पत्ते खुले

By admin | Updated: March 12, 2016 03:19 IST

आंतरराष्ट्रीय बुकी सुनील भाटिया याने बुकी बाजारातील अनेक पत्ते उघड केल्याची चर्चा असून, यामुळे शहरातील बुकी बाजारात खळबळ निर्माण झाली आहे.

नागपूर : आंतरराष्ट्रीय बुकी सुनील भाटिया याने बुकी बाजारातील अनेक पत्ते उघड केल्याची चर्चा असून, यामुळे शहरातील बुकी बाजारात खळबळ निर्माण झाली आहे. दुसरीकडे आयसीसीचा मौसम तोंडावर असताना भाटिया पोलिसांच्या कस्टडीत असल्यामुळे अनेक बुकींनी आजवरचे आपले बस्तान एकीकडून दुसरीकडे हलविल्याची माहिती आहे.पावणेदोन कोटींच्या खंडणीसाठी कुख्यात बुकी अजय राऊत याच्या अपहरणाची कल्पना दिल्याच्या आरोपाखाली गुन्हेशाखेने सुनील भाटियाला अटक केली आहे. सध्या तो पीसीआरमध्ये आहे. आपला अपहरण आणि खंडणी प्रकरणाशी कवडीचा संबंध नसल्याचे भाटिया पोलिसांना सांगत आहे. मात्र, त्याने नागपूरच्या बुकी बाजाराचा आणि येथील बुकींच्या कनेक्शनचा विस्ताराने खुलासा केल्याचे समजते. त्याने इडिच्या फरार आरोपीसह मोठ्याच नव्हे तर शहरातील अनेक बुकींचे नाव चौकशीत घेतले असून, कुणाचे कुठे अड्डे आहेत, त्याचीही माहिती दिल्याचे समजते. पोलिसांनी हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉर्इंटमध्ये टाकलेल्या जुगार अड्ड्याच्या धाडीची टीप भाटियाच्या पंटरकडूनच मिळाल्याची चर्चा आहे. या धाडीत पोलिसांनी राज अलेक्झांडर, गोलू तोतवाणी, विजय चुग आणि सादराणी या चार बुकींसह १३ जणांना अटक केली होती. पोलिसांनी कारवाईसाठी गडबड केली अन्यथा शहरातील अनेक बुकी पोलिसांना या अड्ड्यावर सापडले असते, असेही आता उघड झाले आहे. दरम्यान, पकडण्यात आलेला राज, गोलू आणि चुग शहरातील अनेक भागात क्रिकेटचे हायटेक सट्टा अड्डे चालवतात. नाईसवाला अजय, आरजीबी आणि अन्य साथीदारांनी धरमपेठेतून बाजूलाच अड्डा हलविल्याचीही माहिती आहे. पोलीस आता त्यांच्या कशा मुसक्या बांधतात, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)