कुख्यात जाकीरचा मृतदेह आढळला

By Admin | Updated: June 29, 2014 00:42 IST2014-06-29T00:42:38+5:302014-06-29T00:42:38+5:30

कुख्यात गुन्हेगार जाकीर ऊर्फ बशिर पठाण (वय ४५) याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गुन्हेगारी जगतात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्याचा मृत्यू घातपाताचा प्रकार असल्याचे बोलले जाते.

The body of the notorious Jakir found | कुख्यात जाकीरचा मृतदेह आढळला

कुख्यात जाकीरचा मृतदेह आढळला

घातपाताचा संशय : गुन्हेगारी जगतात उलटसुलट चर्चा
नागपूर : कुख्यात गुन्हेगार जाकीर ऊर्फ बशिर पठाण (वय ४५) याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गुन्हेगारी जगतात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्याचा मृत्यू घातपाताचा प्रकार असल्याचे बोलले जाते. मात्र, ज्या खोलीत जाकीर मृतावस्थेत आढळला, त्या खोलीचे समोरचे दार आणि मागच्या गॅलरीचे दारही आतून कडी लावून बंद असल्याने पोलीस घातपाताचा इन्कार करीत आहेत.
जाकीर पठाणचा गुन्हेगारी जगतात मोठा दबदबा आहे. अजनी, नंदनवन, कोतवाली आणि अन्य पोलीस ठाण्यात त्याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. शहरातील एका भाईचा ‘राईट हॅण्ड‘ म्हणूनही त्याची ओळख आहे. प्राणघातक हल्ले, खंडणी वसुली, अपहरण असे गुन्हे तो वारंवार करीत असल्याने परिमंडळ चारचे उपायुक्त चंद्रकिशोर मिना यांनी त्याला काही दिवसांपूर्वीच हद्दपार केले होते. मात्र, कुख्यात जाकीर नागपुरातच मुक्कामी होता.
नंदनवनमधील व्यंकटेशनगरात एनआयटीने बांधलेल्या घरकुलातील डी विंगमधील दुसऱ्या माळ्यावर २१४ क्रमांकाची सदनिका त्याने भाड्याने घेतली होती. तीन महिन्यांपासून तेथे राहात होता. त्याला दोन बायका असल्याचे पोलीस सांगतात. आज सायंकाळी इमारतीतील मुले बाजूला खेळत असताना त्यांना तीव्र दुर्गंध आला. त्यांनी ते नागरिकांना सांगितले. त्यानंतर ही माहिती नंदनवन पोलिसांना कळली. (प्रतिनिधी)

Web Title: The body of the notorious Jakir found