शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नंदनवनमध्ये महिलेचा निर्घृण खून

By admin | Updated: July 6, 2014 00:45 IST

नंदनवन परिसरात एका महिलेचा निर्घृण खून झाला. मारेकऱ्याने तिच्या छातीवर, डोक्यावर धारदार शस्त्राचे घाव घालून तिला फरफटत रस्त्याच्या कडेला फेकले. शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आलेल्या

परिसरात थरार : मृत महिला अनोळखी नागपूर : नंदनवन परिसरात एका महिलेचा निर्घृण खून झाला. मारेकऱ्याने तिच्या छातीवर, डोक्यावर धारदार शस्त्राचे घाव घालून तिला फरफटत रस्त्याच्या कडेला फेकले. शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात थरार निर्माण झाला. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.नंदनवनमधील चांदमारी माता मंदिराजवळून जाणाऱ्या एका दाम्पत्याला शुक्रवारी रात्री ११.५० ला रस्त्याच्या कडेला एक महिला पडून दिसली. त्याने ही माहिती नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने नंदनवन पोलिसांना कळविले. पोलीस पोहचले तेव्हा घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी होती. महिलेच्या डोक्यातून, छातीतून रक्त वाहात होते. तिच्या सर्वांगावर जखमा होत्या. बघ्यांपैकी कुणीच महिलेला ओळखत नव्हते. तिच्याजवळ तिची ओळख पटविण्यास मदत करणारा कोणताच दुवा नव्हता. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच नंदनवनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले, पीएसआय साहेबराव गजभारे, नाईट राऊंडवर असलेले पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्यासह अनेक अधिकारी आपापल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.ती कोण, कुठली?मृत महिला अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील असून, तिचा वर्ण सावळा आहे. उंची ५ फूट आणि बांधा मजबूत आहे. तिच्या शरीरावर काळी सलवार आणि पांढरा-जांभळा कुर्ता आहे. तिच्या डोक्यावर, डोळ्यावर शस्त्राने मारल्याच्या तर, छातीत भोसकल्याची जखम आहे. गुडघ्यात आणि कंबरेत फ्रॅक्चर आहे. मारेकऱ्याने तिला वाहनाची धडक दिली असावी, असा अंदाज फ्रॅक्चरमुळे डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मारेकऱ्याने तिला १५ ते २० मिटर फरफटत नेले असावे, असे घटनास्थळावरचे चित्र होते. फरफटत नेल्यामुळे तिचे शरीर पुरते सोलून निघाले. कपडेही फाटले होते.बलात्काराची शक्यता नाकारलीमारेकऱ्याने तिला निर्दयीपणे ठार मारले. खुनापूर्वी तिच्यावर बलात्कारही केला असावा, असा पोलिसांचा संशय होता. मात्र, आज तिचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याची शक्यता नाकारल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)निष्पाप जीवाचाही बळी महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र असल्यामुळे ती विवाहित असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी आधीच काढला होता. डॉक्टरांनी ती गर्भवती होती, असेही आज स्पष्ट केले. तिच्या उदरात तीन महिन्यांचे बाळ होते. तिच्यासोबतच या निष्पाप जीवाचाही मारेकऱ्याने बळी घेतला. तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला. तिचे छायाचित्र पाठवून अशा वर्णनाची महिला बेपत्ता आहे काय, त्याची दिवसभर चौकशी केली. वृत्त लिहिस्तोवर मृत महिलेची ओळख पटविण्यास कुणीही पुढे आले नव्हते.