शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचा चौकात खून

By admin | Updated: September 15, 2014 01:04 IST

यशोधरानगर चौकात असामाजिक तत्त्वांनी एका तरुणाचा दिवसाढवळ्या खून केला. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे यशोधरानगरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. एका आठवड्याच्या

यशोधरानगरातील घटना : पितापुत्रासह तीन अटकेत नागपूर : यशोधरानगर चौकात असामाजिक तत्त्वांनी एका तरुणाचा दिवसाढवळ्या खून केला. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे यशोधरानगरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. एका आठवड्याच्या आत यशोधरानगर परिसरातील खुनाची ही दुसरी घटना आहे. इजहार ऊर्फ मोनु इरशाद मलीक (१९) रा. परवेजनगर असे मृत तरुणाचे नाव आहे. यशोधरानगर पोलिसांनी रात्री उशिरा या खुनाचा सूत्रधार काजू खाँ, त्याचे वडील नन्हे खाँ आणि भाऊ कल्लू खाँ याला अटक केली. प्राथमिक चौकशीत दारू पिण्याच्यासाठी पैसे न दिल्यामुळे झालेल्या वादातून हा खून झाल्याचे सांगितले जात आहे. मृत मोनू हा स्कूल आॅटो चालवित होता. त्याच्या कुटुंबात वडील, मोठा भाऊ सोनू आणि लहान भाऊ असलान आहेत. वडील आणि भाऊ सोनूसुद्धा आॅटोचालक आहेत. आज रविवार असल्याने शाळेला सुटी होती. त्यामुळे मोनू सकाळपासूनच वस्तीत फिरत होता. दुपारी ३ वाजता मोनूचा भाऊ सोनू याला आरोपी काजूने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु सोनूने नकार दिल्याने काजूने त्याला थापड मारली. सोनू तक्रार दाखल करण्यासाठी यशोधरानगर पोलीस ठाण्यात पोहोचला. आरोपीला जेव्हा माहिती झाली तेव्हा आरोपी व त्याचे कुटुंबीय सोनूला शोधू लागले. मोनूचे घर यशोधरानगर चौकात आहे. दुपारी ३.३० वाजता मोनू घराकडे पायी जात असताना काजू व त्याचे कुटुंबीय त्याच्याजवळ पोहोचले आणि त्याला शिवीगाळ करू लागले. समजावण्याचा प्रयत्न केला असता ते त्याला मारहाण करू लागले. त्यानंतर काही वेळाने आरोपी शस्त्रासह पोहोचले आणि त्याच्यावर हल्ला केला. मोनूने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु अपयशी ठरला. त्याला गंभीर जखमी करून आरोपींनी पोबारा केला. नातलगांनी गंभीर जखमी अवस्थेत मोनूला मेयो रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. घटनेत सहभागी असलेल्या शेबूच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी यशोधरानगर पोलीस ठाणे परिसरात आॅटोच्या नावावर गुन्हेगारी कृत्य चालवित असल्याची माहिती आहे. जमीन बळकावण्याच्या टोळीसोबतच त्यांचे तार जुळले आहेत. १ सप्टेंबर रोजी प्रॉपर्टी डीलर ३५ वर्षीय जमील खान दिलावर खान ऊर्फ पटेल यांचासुद्धा संपत्तीच्या वादातून खून करण्यात आला होता. जमीलचा ३२ वर्षीय भाऊ नईम खान जखमी झाला होता. खून होण्यापूर्वी खान बंधू आपले मोठे भाऊ वकील यांच्यासोबत यशोधरानगर पोलीस ठाण्यात मदत मागण्यासाठी आले होते. खुनाचा आरोपी सगीर अन्सारी आणि त्याचा मुलगा सरफराज खान बंधूंची वांजरी येथील जमीन बळजबरीने बळकावण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी त्यांना मदतीचे आश्वासन देऊन परत पाठविले. परंतु पोलिसांनी मदत न पाठविल्याने जमीलचा खून करण्यात आला. पोलिसांनी फरार आरोपीला अजूनही पकडलेले नाही. (प्रतिनिधी)