शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

खुनानंतर ‘सायको किलर’ प्यायचा रक्त

By admin | Updated: February 19, 2015 02:02 IST

खून केल्यानंतर ‘सायको किलर ’ राकेश हाडगे हा रक्त पित होता. त्याला रक्ताची चटक लागली होती, अशी धक्कादायक माहिती आहे. माहितीगार सूत्राकडून ही माहिती प्राप्त झाली.

नागपूर : खून केल्यानंतर ‘सायको किलर ’ राकेश हाडगे हा रक्त पित होता. त्याला रक्ताची चटक लागली होती, अशी धक्कादायक माहिती आहे. माहितीगार सूत्राकडून ही माहिती प्राप्त झाली. मात्र तपास अधिकाऱ्याने खून करण्यामागील आरोपीचा हेतू स्पष्ट झाला नसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. आरोपीने तीन दिवसात लागोपाठ तीन अनोळखी युवकांचे खून केले आहेत. सूत्राने असेही सांगितले की, केवळ नशा म्हणून तो रक्त पिण्यासारखे हे अघोरी कृत्य करीत होता. वेडसरपणाचा झटका आल्यानंतर तो चार-पाच जणांना जुमानत नव्हता. अंधार पडताच त्याची भटकंती सुरू होत होती. सामसूम ठिकाणी तो एकट्या माणसावर हल्ला करायचा. समोरच्याला काहीही कळण्यापूर्वीच चाकूने असंख्य वार करून तो मुडदा पाडायचा आणि रक्त प्यायचा.राकेशला वडील नाहीत. त्याची आई भीक मागून त्याचे आणि आणखी एका लहान मुलाचे पालनपोषण करीत आहे. खुनांमागील हेतू काय ?लागोपाठ तिन्ही युवकांचा निर्घृण खून करण्यामागे आरोपीचा हेतू काय, त्यासंबंधाने सखोल तपास करणे आहे. अनोळखी मृतदेहांची ओळख करणे आहे, खुनानंतर आरोपीने मृताच्या अंगावरील कपडे काढून ठेवले आहेत, ते कोठे लपवून ठेवले, ते हुडकून काढून जप्त करणे आहे. खून करण्यासाठी आरोपीने साथीदारांची मदत घेतली असावी, त्यांचा शोध घेणे आहे. खून करण्यासाठी आरोपीने चाकूव्यतिरिक्त इतर शस्त्र आणि साधनांचा वापर केला असावा, त्या संबंधाने तपास करणे आहे. या महत्वाच्या मुद्यांवर आरोपीचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला. सरकारने नेमला वकील पोलीस कोठडी रिमांडदरम्यान या आरोपीची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी लिगल एडमार्फत अ‍ॅड. निशा भावसागर यांची नेमणूक करण्यात आली. पोलीस कोठडी रिमांडला विरोध करताना त्या म्हणाल्या, आरोपी हा पोलीस कोठडीतच आहे आणि हा कालावधी पुरेसा आहे. या प्रकरणात चुकीने आरोपीला गोवण्यात आले, असेही त्या म्हणाल्या. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तो काहीही बोलत नाहीया तिन्ही खुनाच्या संदर्भात हा आरोपी काहीही बोलत नाही. एक प्रश्न विचारल्यानंतर मोठ्या मुश्किलीने दहा-पंधरा मिनिटानंतर तो उत्तर देतो, असे तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले. बुरख्यात हजर केले न्यायालयातनागपूर : ‘सायको किलर’ ला बुधवारी बुरख्यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. शर्मा यांच्या न्यायालयात हजर करून त्याचा २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला. २२ वर्षाचा राकेश हरिभाऊ हाडगे हा कळमना हद्दीतील तुळशीनगर येथील रहिवासी आहे. त्याने पहिला खून १५ फेब्रुवारी रोजी करून मृतदेह नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळशीनगर रेल्वे लाईनच्या बाजूच्या नाल्यात फेकून दिला. दुसरा खून १६ फेब्रुवारी रोजी करून मृतदेह नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतच नेहरूनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ फेकून दिला. तर तिसरा खून १७ फेब्रुवारी रोजी करून मृतदेह कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाराद्वारी तलावलगतच्या बाभळीच्या झुडपात फेकून दिला. तिन्ही मृतदेह ३० ते ३५ वयोगटातील युवकांचे असून त्यांची अद्यापही ओळख पटलेली नाही. मृतांच्या तोंडावर, मानेवर, छातीवर, पोटावर, गुप्तांगावर, मानेवर आणि पाठीवर शस्त्रांच्या असंख्य जखमा आहेत. हा आरोपी मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बाराद्वारी तलाव या घटनास्थळाच्या परिसरात सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलजवळ संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची स्कूल बॅग लटकलेली होती. पोलिसांनी ही बॅग तपासली असता त्यांना रक्ताने माखलेला चाकू आणि रक्ताने भरलेले कपडे आढळून आले होते. लागलीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन बाराद्वारी तलावाजवळील खुनात अटक केली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एस.एम. बंडीवार यांनी आरोपीला बुरख्यात हजर करून त्याचा २४पर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. (प्रतिनिधी)