शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

विधी विद्यापीठासाठी काळडोंगरीत जमीन

By admin | Updated: March 16, 2015 02:19 IST

विदर्भासाठी खूशखबर आहे. बहुप्रतिक्षित महाराष्ट्र विधी विद्यापीठासाठी जामठ्याजवळच्या काळडोंगरी येथील जमीन ‘फायनल’ करण्यात आली आहे.

नागपूर : विदर्भासाठी खूशखबर आहे. बहुप्रतिक्षित महाराष्ट्र विधी विद्यापीठासाठी जामठ्याजवळच्या काळडोंगरी येथील जमीन ‘फायनल’ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित राज्य वकील परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. १७ एप्रिल २०१३ रोजी राज्यात नागपूर, मुंबई व औरंगाबाद येथे नॅशनल लॉ स्कूलच्या धर्तीवर महाराष्ट्र विधी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, मुंबई व औरंगाबादच्या तुलनेत नागपुरातील विधी विद्यापीठाचे गाडे पुढे सरकत नव्हते. वारंवार तगादा लावल्यानंतर शासनाने ७० कोटी रुपयांची तरतूद केली. यानंतर जमिनीचा प्रश्न कायम होता. उच्च विभागाचे सहसंचालक डी.बी. पाटील यांनी अनेक ठिकाणी जमिनीचा शोध घेतला होता. शहरात जमीन मिळणे अशक्य असल्याचे समजल्यानंतर शहराबाहेरील जमिनीचा शोध सुरू झाला होता. हा शोध काळडोंगरी येथे संपला आहे. फडणवीस यांच्या माहितीनंतर महाराष्ट्र विधी विद्यापीठ काळडोंगरी येथेच होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात नॅशनल लॉ स्कूल स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतर नागपूरचे नाव आघाडीवर होते. हायकोर्ट बार असोसिएशन आॅफ नागपूरच्या अमृतमहोत्सवी समारंभात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नागपुरात नॅशनल लॉ स्कूल स्थापन करण्याला पाठिंबा दिला होता. नागपूर जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यक्रमात तत्कालीन केंद्रीय विधी व न्यायमंत्री वीरप्पा मोईली यांनीही या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. नागपूरला नॅशनल लॉ स्कूल मिळाले नसले तरी महाराष्ट्र विधी विद्यापीठामुळे शिक्षण क्षेत्रातील मोठी पोकळी भरून निघणार आहे.(प्रतिनिधी)