रेशनचा काळाबाजार, ४.७६ लाखाचे धान्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST2021-06-24T04:08:15+5:302021-06-24T04:08:15+5:30

पोलिसांनी कुंदनलाल गुप्तानगरच्या बंडू किराणाजवळ नजर ठेवली. पोलिसांना पाहून सलमान ऊर्फ शम्मीखान पठान तसेच त्याचा एक साथीदार पळून गेला. ...

Black market of rations, 4.76 lakh grains seized | रेशनचा काळाबाजार, ४.७६ लाखाचे धान्य जप्त

रेशनचा काळाबाजार, ४.७६ लाखाचे धान्य जप्त

पोलिसांनी कुंदनलाल गुप्तानगरच्या बंडू किराणाजवळ नजर ठेवली. पोलिसांना पाहून सलमान ऊर्फ शम्मीखान पठान तसेच त्याचा एक साथीदार पळून गेला. पोलिसांनी परिसरातील एका गोदामात धाड टाकली. तेथे १४ टन तांदूळ आणि दुसरे धान्य मिळाले. त्याची किंमत ४.७६ लाख रुपये होती. पोत्यांचे वजन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तराजू लावला होता. पोलिसांनी तराजू आणि एक वाहनही जप्त केले. सोनु पठान या रॅकेटचा सूत्रधार आहे. तो साथीदारांच्या मदतीने धान्याची खरेदी करून व्यापाऱ्यांना विकतो. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने धान्य जप्त केले. उत्तर नागपुरात रेशनचा काळाबाजार करणाºया अनेक टोळ्या सक्रिय आहेत. आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक मेश्राम, उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव, हवालदार दीपक धानोरकर, गजानन गोसावी, संतोष यादव, नीलेश घायवट, लक्ष्मीकांत बारलिंगे, प्रफुल्ल चिंतले यांनी पार पाडली.

...........

Web Title: Black market of rations, 4.76 lakh grains seized