मनपा निवडणुकीसाठी युवाशक्तीवर भाजपचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:08 IST2021-07-27T04:08:18+5:302021-07-27T04:08:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपने संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. महिला मोर्चाची जम्बो कार्यकारिणी घोषित ...

BJP's emphasis on youth power for municipal elections | मनपा निवडणुकीसाठी युवाशक्तीवर भाजपचा भर

मनपा निवडणुकीसाठी युवाशक्तीवर भाजपचा भर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपने संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. महिला मोर्चाची जम्बो कार्यकारिणी घोषित केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजयुमोच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नावेदेखील जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक लक्षात घेता कार्यकारिणीत १३३ जणांना स्थान देण्यात आले आहे.

भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. भाजयुमोचे अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्या नेतृत्वातील कार्यकारिणीत सचिन करारे, दीपांशू लिंगायत, अमोल तिडके हे तीन महामंत्री आहेत. याशिवाय संपर्कमंत्री मनीष मेश्राम, कोषाध्यक्ष विजय देडमुठे, कार्यालय मंत्री सारंग गोडबोले, आत्मनिर्भर भारत अभियानप्रमुख अमेय विश्वरूप यांचादेखील कार्यकारिणीत समावेश आहे. कार्यकारिणीमध्ये दोन सहकोषाध्यक्ष, सहा संपर्कप्रमुख, १ विद्यार्थीप्रमुख यांच्यासह ४८ उपाध्यक्ष, ४५ मंत्री, ३३ सदस्य बनविण्यात आले आहेत.

Web Title: BJP's emphasis on youth power for municipal elections