शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

छावणी परिषदेवर भाजप गटाचे वर्चस्व

By admin | Updated: January 13, 2015 01:04 IST

छावणी परिषदेच्या (कॅन्टोनमेंट बोर्ड) सात जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या सोमवारी घेण्यात आलेल्या मतमोजणीत भाजप समर्थित गटाचे वर्चस्व दिसून आले.

कामठी कॅन्टोनमेंट बोर्ड निवडणूक : चार नगरसेवकांचा पराभवकामठी : छावणी परिषदेच्या (कॅन्टोनमेंट बोर्ड) सात जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या सोमवारी घेण्यात आलेल्या मतमोजणीत भाजप समर्थित गटाचे वर्चस्व दिसून आले. या निवडणुकीत चार विद्यमान नगरसेवकांना पराभवाला सामोरे जावे लागले. छावणी परिषद उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी मतमोजणी करण्यात आली. वॉर्ड क्रमांक १ मधून दीपक सिरिया (४६२) मते घेत त्यांनी विजयाचा गड कायम ठेवला. या वॉर्डाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी अमिता सिरिया करीत होत्या. वॉर्ड क्रमांक २ मध्ये दिनेश स्वामी (२७३) मते घेऊन विजयी झाले. वॉर्ड क्रमांक ३ महिलासाठी राखीव असल्यामुळे भाजप समर्थित गटाच्या विजयालक्ष्मी अशोक राव यांनी ३६४ मते घेत विजश्री खेचून आणला. या वॉर्डातील विद्यमान नगरसेवक प्रमेंद्र यादव हे वॉर्ड क्रमांक ६ मधून निवडणूक लढले. त्यांना तेथे पराभव स्वीकारावा लागला. वॉर्ड क्रमांक ४ (महिला राखीव) वॉर्डात नगरसेवक गोपालसिंग यादव यांच्या स्रुषा सीमा कमल यादव यांचा ५६८ मते घेऊन विजय झाला. त्यांनी काँग्रेस गटाच्या कीर्ती यादव यांचा ३५३ मतांनी पराभव केला. छावणी परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविण्याचा बहुमान सीमा यादव यांना प्राप्त झाला आहे. वॉर्ड क्रमांक ५ मधून भाजप समर्थित गटाचे सुनील फ्रान्सिस २४१ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी विद्यमान नगरसेवक शेख साकीर यांचा ११२ मतांनी पराभव केला. वॉर्ड क्रमांक ६ मधून काँग्रेस समर्थित गटाचे नरेंद्र बुटानी यांनी ४३० मते घेऊन नगरसेवक महेंद्र बुटानी, प्रमेंद्र यादव यांचा २०८ मतानी पराभव केला. वॉर्ड क्रमांक ७ मधून चंद्रशेखर लांजेवार यांनी ३४९ मते घेऊन नगरसेवक राजू बेलेकर यांचा १५७ मतांनी पराभव केला.या निवडणुकीत विद्यमान नगरसेवक शेख साकीर, प्रेमेंद्र यादव, राजू बेलेकर, महेंद्र बुटानी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजप समर्थित गटाचे चार, दोन अपक्ष तर एक पद काँग्रेसच्या गटाला प्राप्त झाले आहे. छावणी परिषदमध्ये ब्रिगेडिअर हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे उपाध्यक्ष पदावर भाजप समर्थित गटाच्या उमेदवाराची वर्णी लागणार आहे. सर्व विजयी नगरसेवकांनी आपआपल्या वॉर्डात विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला.मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंग, छावणी परिषदेचे मुख्याधिकारी कपिल गोयल, तहसीलदार डी. एस. भोयर, नायब तहसीलदार संजय रामटेके, प्रशांत घुरडे, प्रदीप वरपे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. दरम्यान, ठाणेदार सतीश गोवेकर, अजयकुमार मालवीय यांनी पोलीस बंदोबस्त लावला होता. (तालुका प्रतिनिधी)