भाजप नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:13 IST2021-02-18T04:13:48+5:302021-02-18T04:13:48+5:30

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हनुमानगर झोन क्षेत्रातील पीटीएस क्वॉर्टर, चंदननगर, रेशीमबाग, विवनगर, महावीरनगर आदी भागाला ...

BJP corporator warns of hunger strike | भाजप नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा

भाजप नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हनुमानगर झोन क्षेत्रातील पीटीएस क्वॉर्टर, चंदननगर, रेशीमबाग, विवनगर, महावीरनगर आदी भागाला मागील काही महिन्यांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने भाजपचे नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी महापौर दयाशंकर तिवारी व स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांना उपोषणाचा इशारा दिला आहे.

अधिकारी व पदाधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याचे भोयर यांनी सांगितले. बुधवारी महापौरांनी अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांना बोलावून चर्चा केली. पाणीपुरवठ्याची समस्या निकाली काढण्याचे निर्देश दिले. या भागात आधी तीन-चार तास पाणीपुरवठा होत होता. आता अर्धा तास पाणी मिळते. नागरिक त्रस्त आहेत. मंगळवारपर्यंत प्रश्न न सुटल्यास उपोषणाशिवाय पर्याय नसल्याचे भोयर म्हणाले.

Web Title: BJP corporator warns of hunger strike