शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांसाठी तयार होतेय भाजपची आचारसंहिता

By admin | Updated: March 8, 2016 03:00 IST

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू व्हायची असली तरी भाजपने आपल्या नगरसेवकांसाठी आचारसंहिता

नागपूर : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू व्हायची असली तरी भाजपने आपल्या नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार करण्याची तयारी चालविली आहे. नगरसेवकाने लोकांशी कसे वागावे, काय करावे, पक्ष संघटनेशी कसा समन्वय साधावा आदी बाबींवर यात भर दिला जाणार आहे. नुकतेच शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी भाजप नगरसेवकांची महापालिकेत एक बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवकांना यातील काही निवडक सूचना देण्यात आल्यात. लवकरच नगरसेवकांची बैठक घेऊन संबंधित आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.भाजपचे काही नगरसेवक जनसंपर्कात बरेच माघारले आहेत. त्यांचा परफॉर्मन्सही पाहिजे तसा नाही, असा निष्कर्ष पक्षाच्या प्राथमिक पाहणीत समोर आला आहे. पक्षातर्फे या पाहणीची जाहीर वाच्यता करणे टाळले जात आहे. मात्र, पक्षाने याची वेळीच दखलही घेतली आहे. गेल्या आठवड्यात शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी नगरसेवकांची घेतलेली बैठक याचाच एक भाग होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत कोहळे यांनी नगरसेवकांना सूचक इशारा दिला. सोबतच काम चांगले असणाऱ्यांनाच तिकीट मिळेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री हे महापालिका निवडणुकीप्रती गंभीर असून ते देखील शिफारशींची दखल घेणार नाहीत, असेही स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून नागपूरसाठी सुमारे १८ हजार कोटी रुपये खेचून आणले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत निधी दिला आहे. आमदारांना वाढीव निधी दिला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे यांच्या कार्यकाळात २८३ कोटी रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. या सर्व निधीतून काही विकास कामे सुरू झाली असून काही कामे पुढील दोन-तीन महिन्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास सर्वच प्रभागात विविध विकास कामे सुरू असल्याचे चित्र पुढील चार-सहा महिन्यात पहायला मिळणार आहे. त्यामुळे विकास कामांसाठी पैसा नाही, अशी ओरड नगरसेवकांना करता येणार नाही. अवाजवी कारणे देता येणार नाहीत. नगरसेवकांनी दिलेल्या कारणांचीही पडताळणी केली जाणार आहे. अशी आहे आचारसंहिता ४पक्षाविषयी, पक्षातील नेत्यांविषयी वाईट मत व्यक्त करून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. ४पक्षाच्या बैठकांना, कार्यक्रमांना अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांचा रेकॉर्ड तयार केला जाईल. ४जनसंपर्क वाढवून नागरिकांचे प्रश्न सोडवा.४जनधन योजना, पंतप्रधान आवास योजना, सुकन्या योजना, वीमा सुरक्षा योजना यासह मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना, आदी योजना जनतेपर्यंत घेऊन जा. या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांचे अर्ज भरा. ४पाणी व मालमत्ता कराचे बिल जास्त आल्याची नागरिकांची तक्रार असेल तर संबंधितासोबत झोन कार्यालयात जाऊन त्याच्या समस्येचे निराकरण करण्यास मदत करा.