शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्शन नसतानाही पाठविले बिल

By admin | Updated: February 7, 2015 02:09 IST

तिकोना ब्रॉडबँड सर्व्हिसेसचा आणखी एक बोगसपणा उघडकीस आला आहे. कंपनीतील काही लोकं ग्राहकांकडून जबरी वसुली करीत आहे ...

नागपूर : तिकोना ब्रॉडबँड सर्व्हिसेसचा आणखी एक बोगसपणा उघडकीस आला आहे. कंपनीतील काही लोकं ग्राहकांकडून जबरी वसुली करीत आहे आणि यासाठी त्यांना धमकी देणारे फोन केले जात आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे तिकोनाचे कनेक्शन नाही, अशा लोकांनाही बिल पाठविले जात आहे, याचा खुलासा एका प्रतिष्ठित नागरिकाने केला आहे. तिकोना ब्रॉडबँड कंपनीद्वारा ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकरण लोकमत मागील काही दिवसांपासून प्रामुख्याने प्रकाशित करीत आहे. यात आणखी एक प्रकरण समोर आले आहे. अमरावती रोड चिटणवीसनगर येथील अली हातिम हुसैन यांनी तिकोना ब्रॉडबँड सर्व्हिसेसकडून मिळत असलेल्या धमकीचा खुलासा केला आहे. हुसैन यांच्यानुसार त्यांनी आजपर्यंत तिकोना ब्रॉडबँड सर्व्हिसेस कंपनीच्या सेवेचा वापर केलेला नाही. परंतु त्यांना बील पाठवण्यात येतो. पाठविलेल्या बिलामध्ये त्यांनी वापर केलेल्या सर्व्हिसेसची संख्या शून्य दाखविलेली असते. सोबतच बिल न भरल्यास भरावयाच्या आर्थिक दंडाची रक्कम सुद्धा दर्शविलेली असते. व्यवसायाने सीए असलेले अली हातिम हुसैन यांनी सांगितले की, चार-पाच वर्षांपूर्वी त्यांनी तिकोना ब्रॉडबँडची सेवा घेण्यासाठी एक प्लान पाहिला होता. परंतु त्यांनी प्लान घेतला नाही. दरम्यान त्यांना ‘वायफाय कनेक्ट’ करण्याबाबत अनेक आकर्षक प्रलोभने देण्यात आली. परंतु त्यांनी कनेक्शन घेतले नाही. त्यानंतर कंपनीकडून त्यांना बिल येऊ लागले. हुसैन यांनी यासंदर्भात ४ फेब्रुवारी २०११ रोजी कंपनीला आॅनलाईन तक्रार केली होती. परंतु कंपनीकडून त्यांना मनमानी पद्धतीने बिल पाठविले जात आहे. आजही त्यांना बिल येत आहे.