शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

योजनांच्या नावावर वसुलीचा लाभ

By admin | Updated: March 7, 2016 02:45 IST

केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना घेता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार- प्रसार केला जात आहे.

अर्ज विकणाऱ्या टोळ्या सक्रिय : भाजप, मनपा, नासुप्रकडून दखलनागपूर : केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना घेता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार- प्रसार केला जात आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थींही सरसावले आहेत. नेमका याचा गैरफायदा घेण्यासाठी काही टोळ्या सरसावल्या आहेत. काहींनी बनावट अर्ज छापून त्याची विक्री केली आहे तर काहींनी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांकडून पैसे उकळणे सुरू केले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी गेल्या काही दिवसात भाजपचे पदाधिकारी, महापालिका व नासुप्रकडे आल्या आहेत. संबंधितांनी याची गंभीर दखल घेतली आहे.केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक गरीब माणसाला हक्काचे घर दिले जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी, प्रचार, प्रसार करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज महापालिकेत नि:शुल्क उपलब्ध आहेत. आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित अर्ज महापालिकेत नेमून दिलेल्या केंद्रावर जमा करून १०० रुपये शुल्क भरायचे आहे. महापालिकेतर्फे त्याची पावतीही दिली जाते. मात्र, काही असामाजिक तत्त्वांनी या योजनेचेही अर्ज छापले असून त्यांची २०० रुपयांना विक्री केली जात आहे. अर्ज विकताना याची जाहीर वाच्यता करू नका, जास्त लोकांना माहीत झाले तर तुमचा नंबर लागणार नाही, अशी ताकीद देऊन नागरिकांना चूप राहण्याचा सल्ला या भामट्यांकडून दिला जात आहे. गेल्या आठवड्यात अशा स्वरूपाच्या तक्रारी भाजपच्या आमदारांना प्राप्त झाल्या. आमदारांनी याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. पंतप्रधान आवास योजनेची प्रसिद्धी करावी, या योजनेच्या लाभासाठी नागरिकांनी कुठे संपर्क साधावा याची माहिती सर्वांना सहज उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली. शिवाय अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून महापालिकेने जनजागृती मोहीम राबविण्याचीही मागणी करण्यात आली. नासुप्रतर्फे नंदनवन ले-आऊट येथे मॉडेल हाऊस बिल्डिंग उभारण्यात आली आहे. या घरांची किंमत बाजार किमतीच्या ४० टक्केच आहे. अशाच प्रकारची घरे स्वस्तात नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. संबंधित घरांच्या वाटपासाठी नासुप्रतर्फे रीतसर वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाणार असून लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. अद्याप नासुप्रने अर्ज मागविण्यासाठी कुठलीही जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही किंवा अर्ज स्वीकारण्यास सुरुवातही केलेली नाही. मात्र, काही असामाजिक तत्त्वांकडून संबंधित गाळ्यांसाठी अर्जांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काहींनी तर लाभार्थ्यांना गाळे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी एक-दीड लाख रुपये देण्याची मागणी केली आहे अशा तक्रारी नासुप्रकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत नासुप्रचे पथक कामी लागले असून संबंधितांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये. काहीही माहिती हवी असल्यास थेट नासुप्रशी संपर्क साधावा, असे आवाहन नासुप्रचे मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार यांनी केले आहे.(प्रतिनिधी)