शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना घरकुलाचा लाभ

By admin | Updated: February 22, 2016 03:07 IST

दिव्यांग व्यक्तींमध्ये असणाऱ्या विशेष अंगभूत गुणांमुळे ते सामान्यांपेक्षा जास्त चांगली कामगिरी बजावू शकतात.

देवेंद्र फडणवीस : दिव्यांगांना आधुनिक साहित्य व उपकरणांचे वाटपनागपूर : दिव्यांग व्यक्तींमध्ये असणाऱ्या विशेष अंगभूत गुणांमुळे ते सामान्यांपेक्षा जास्त चांगली कामगिरी बजावू शकतात. त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. दिव्यांग व्यक्तींना घरकूल योजनेसाठी दारिद्र्य रेषेखाली असण्याची अट शासनाने काढून टाकली आहे. त्यामुळे आता प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला घरकूल योजनेचा लाभ घेता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.महाराष्ट्र राजस्व अभियान २०१५ अंतर्गत मध्य नागपूर व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, अपंग सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, महात्मा गांधी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी चिटणीस पार्क येथे दिव्यांग लाभार्थ्यांना नि:शुल्क आधुनिक साहित्य व उपकरण वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल सोले, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांच्यासह दिव्यांग लाभार्थी आणि पालक उपस्थित होते. यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांना ११३३ प्रकारचे आधुनिक साहित्य व उपकरणांचे वाटप करण्यात आले. यामध्ये अंध व्यक्तींना डेझी प्लेअर्स, इलेक्ट्रॉनिक केन, ब्रेलकॅटस्चे वाटप करण्यात आले. तसेच कर्णबधीर आणि मतिमंद व्यक्तींकरिता व्हीलचेअर, आधुनिक श्रवणयंत्र, एमआर कीटस्चे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी २५० मोटराईज ट्रायसिकल लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या. ही ट्रायसिकल बॅटरीवर चालणारी असून ती ४० किलोमीटरपर्यंत चालते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्याबाबत जिल्हा पातळीवर कार्यवाही सुरू आहे. सर्व दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना आधुनिक साहित्य आणि उपकरणे देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिव्यांगांना शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण तसेच आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. नितीन गडकरी म्हणाले, समाजातील दिव्यांग लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने अशा कार्यक्रमाचे विशेष महत्त्व आहे. दिव्यांग व्यक्तींबद्दल संवेदनशील भावना जपणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. त्यांना सन्मानाने जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्या योजनांचा आणि उपक्रमांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ही सामाजिक जबाबदारी आहे. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले. प्रारंभी अंध विद्यालय, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूरच्या विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीत सादर केले. या स्वागतपर गीताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. संचालन दिनेश मासोदकर आणि श्वेता शेलगावकर यांनी केले. बंडू राऊत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)