शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बेलसरे, भारंबेवर निवडणुकीचा भार

By admin | Updated: March 12, 2015 02:47 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी आॅगस्टनंतर निवडणूका होणार आहेत.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी आॅगस्टनंतर निवडणूका होणार आहेत. यासाठी सहाय्यक म्हणून विद्यापीठातील लोकांना संधी न देता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची तात्पुरती सेवा घेण्यात येणार आहे. विद्यापीठात अधिकारी असतानादेखील बाहेरील व्यक्तींची नियुक्ती करण्यामागे नेमका उद्देश काय आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विकासकामांसाठी कंपन्यांकडे दान मागणाऱ्या विद्यापीठाकडून ‘आऊटसोर्स’ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर लाखो रुपये खर्च करण्यात येणार आहेत.महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ च्या कलम ४२(१) नुसार ३१ आॅगस्ट रोजी विविध प्राधिकरणांच्या सदस्यांचा कालावधी संपुष्टात येणार आहे. अधिनियमातील ४२(२) च्या तरतुदींनुसार यानंतर निवडणुका घेणे आवश्यक असून त्याचा कार्यक्रम जाहीर करणे गरजेचे आहे. निवडणुकांचे काम सुरळीतपणे पार पाडावे याकरिता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत विशेष निवडणूक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकांचे निर्णय अधिकारी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव व सहायक निर्णय अधिकारी म्हणून उपकुलसचिव (सा.प्र.) व उपकुलसचिव (विद्या शाखा) हे काम पाहणार आहेत. परंतु निवडणुकांची वास्तविक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाष बेलसरे व माजी उपकुलसचिव भारंबे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. इच्छुकांचे अर्ज मागविणे, त्यांची छाननी करणे, यादी तयार करणे इत्यादी निवडणुकींशी संबंधित कामे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होणार आहेत. विद्यापीठाकडून त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी कर्मचारीदेखील देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे निवृत्त होताना जितके वेतन होते,जवळपास तितकेच मानधन या कामासाठी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठात अनेक कार्यक्षम अधिकारी आहेत. अनेक सहायक उपकुलसचिवांकडे ही जबाबदारी दिली तर ते चांगल्या पद्धतीने कामदेखील करू शकतात व त्यांना अनुभवदेखील मिळू शकतो. परंतु विद्यापीठाने मात्र निवृत्त अधिकाऱ्यांकडून सेवा घेण्याचा निर्णय का घेतला याबाबत संभ्रम कायम आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांच्याशी संपर्क झाला नाही. या अधिकाऱ्यांची सेवा ही तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात येणार आहे. अगोदरच विद्यापीठात अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यात जर निवडणुकांचे पूर्णवेळ काम कोणाच्या मागे लावले तर नियमित कामांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन निवृत्त अधिकाऱ्यांची तज्ज्ञ म्हणून सेवा घेण्यात येत असल्याची माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. परंतु विद्यापीठातील रिक्त पदे का भरण्यात येत नाही, अशी विचारणा केली असता त्यांनी मौन साधले. (प्रतिनिधी)