शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या निविदेचा मुहूर्त टळला

By admin | Updated: May 20, 2015 02:55 IST

नागपूर मेट्रो रेल्वेची १८ मे रोजी उघडणाऱ्या पहिल्या निविदेचा मुहूर्त टळला आहे. कंपनीने पहिली आॅनलाईन निविदा १८ एप्रिलला जारी केली होती.

मेट्रो रेल्वे : आठवड्यात निविदा उघडणारनागपूर : नागपूर मेट्रो रेल्वेची १८ मे रोजी उघडणाऱ्या पहिल्या निविदेचा मुहूर्त टळला आहे. कंपनीने पहिली आॅनलाईन निविदा १८ एप्रिलला जारी केली होती. जवळपास ८० कोटी रुपयांच्या निविदेत सहा जणांनी रुची दाखविली होती. त्यांचे कागदपत्रेही प्राप्त झाली आहेत. त्या आधारावर नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन तांत्रिक मूल्यांकनाचे काम करीत आहे. हे कार्य चार ते पाच दिवस पुन्हा सुरू राहणार आहे. अशा स्थितीत या आठवड्याच्या अखेरपर्यंत मेट्रो रेल्वेची पहिली आॅनलाईन निविदा उघडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माहितीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही. प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी ८० कोटी रुपयांची पहिली आॅनलाईन निविदा काढण्यात आली होती. वर्धा रोडवर विमानतळ विभागात शिवणगाव रोड ते मिहानपर्यंतच्या ४.५ कि़मी. क्षेत्रात ५ फूट उंच सुरक्षा भिंत, दोन पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यानंतर मेट्रो रेल्वे धावण्यासाठी सुरक्षा भिंतीमध्ये ट्रॅक टाकण्यात येईल. यासाठी विमानतळ विकास कंपनीकडून एनएमआरसीएलला सुमारे ३७ हेक्टर जमीन मिळाली. निर्माण कार्यासाठी मार्किंग केली आहे. (प्रतिनिधी)जूनपर्यंत सल्लागारांची नियुक्तीजूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मेट्रो रेल्वेसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचे सूतोवाच नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी नुकतेचे केले होते. यासाठी राईट्स आणि दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला अंतर्गत सल्लागार नियुक्त केले आहे. राईट्स सल्लागाराच्या नियुक्तीसाठी कार्यरत आहे.