शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबरला गुरुदेवभक्तांचे राज्यात ठिकठिकाणी धरणे

By admin | Updated: September 7, 2014 03:27 IST

गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक ११ सप्टेंबर २0१४ रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देणार आहेत.

वाशिम : राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राज्यभरातील सेवक येत्या ११ सप्टेंबर २0१४ रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देणार आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव भारताच्या राष्ट्रपुरुषांच्या यादीत असावे यासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीच्या माध्यमातून राज्य शासनाकडे अनेकदा प्रस्ताव पाठवून मागणी करण्यात आली. यासंदर्भात अनेकदा पाठपुरावा केल्यानंतरही आश्‍वासनाखेरीज पदरी काहीच पडले नाही. ह्यलोकमतह्णने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानं तर राज्यभर या विषयाला धरुन जनजागर झाला. यामधून शासनदरबारी दाद मागण्याचे काम सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधी व जनसामान्यांच्या माध्यमातून सुरु झाले. हा जनजागराचा लढा अधिक जागृत करण्याच्या दृष्टीने पावले उचलत अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून क्रांतीदिन ९ ऑगस्ट ते ३0 ऑगस्ट २0१४ दरम्यान विदर्भातील ११ ही जिल्ह्यात क्रांतीज्योत यात्रा काढली. यामधून विदर्भातील ९0 तालुके, १७८ गावांत जनतेत २७२ ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम घेवून शासनाच्या उदासिनतेविषयी जनमत जागे करण्याचे काम केले गेले. क्रांतीज्योत यात्रेदरम्यानंतरही गुरुदेवप्रेमींच्या भावनांची दखल राज्य शासनाने न घेतल्याने ११ सप्टेंबर २0१४ रोजी राज्यभरातील गुरुदेवप्रेमी जनतेच्या माध्यमातून अखील भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने धरणे देणार आहेत. वंदनीय राष्ट्रसंतांच्या स्वातंत्र्य चळवळीला आवर घालण्यासाठी इंग्रजांनी २८ ऑगस्ट १९४२ रोजी अटक करुन तुरुंगात डांबले होते. राष्ट्रसंतांनी शांतीच्या माध्यमातून क्रांती घडविण्याचे काम केल्यांनेच स्वातंत्र्यासाठी झटलेल्यांनी त्यांना राष्ट्रसंत संबोधले. आज ती मंडळी राष्ट्रपुरुषाच्या यादीत असली तरी राष्ट्रसंतांना त्यात समाविष्ट केले नाही. हे न जनमनाला न पटणारे असून आता याविषयी जनभावना तिव्र झाल्या आहेत. शासनाने याची वेळीच दखल घ्यावी, असा इशारा अ. भा. गुरुदेव सेवा मंडळाचे विदर्भ प्रांत सेवाधिकारी भानुदास कराळे यांनी दिला.