शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

हरवलेल्या मुलीला शोधण्यात ‘सोशल मीडिया’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:28 PM

पोलिसांनीही माणुसकीचा परिचय देत तिचे छायाचित्र ‘सोशल मीडिया’वर व्हायरल केले. याच सोशल मीडियामुळे अखेर ती कुटुंबीयांपर्यंत पोहोचली.

ठळक मुद्देगतिमंद मुलगी पोहोचली कुटुंबीयांपर्यंत : नागपुरातील हिंगणा पोलिसांचा हातभार, चार दिवसांपूर्वी दुरावली होती कुटुंबीयांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वय २५ वर्षे, पण तिच्या शरीरयष्टीवरून ती १२ वर्षांचीच तर नाही ना, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. तिला स्पष्ट बोलताही येत नाही. गतिमंद मुलगीच ती... बुलडाणा येथून वडिलांसोबत मेडिकलमध्ये आली असताना ती वडिलांपासून दूर झाली... शोधाशोध केली, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. चालत चालत तब्बल १०-१२ कि.मी. पेवठा शिवारापर्यंत पोहोचली. तिच्या इकडे-तिकडे फिरण्याने संशय आला. त्यामुळे हिंगणा पोलिसांना सांगितले. पोलिसांनीही माणुसकीचा परिचय देत तिचे छायाचित्र ‘सोशल मीडिया’वर व्हायरल केले. याच सोशल मीडियामुळे अखेर ती कुटुंबीयांपर्यंत पोहोचली.उषा धुरंदर (२५, रा. वाघुडा, ता. मलकापूर, जि. बुलडाणा) असे या मुलीचे नाव. ती गतिमंद असल्याने तिला उपचारासाठी तिचे वडील अशोक धुरंदर यांनी ८ मार्चला तिला मेडिकलमध्ये आणले होते. तेथे वडिलांची चुकामूक होऊन ती तेथून निघाली. नीटसे बोलताही येत नसल्याने तिच्यासमोर समस्या उद्भवली. इकडे तिच्या वडिलांनी बराच वेळ शोधाशोध केली; मात्र त्याचा काहीएक फायदा झाला नाही. निराश होऊन अखेर त्यांनी गाव गाठले.दुसरीकडे उषा ही चालत चालत पेवठा शिवारातपर्यंत पोहोचली. तिच्या शरीरयष्टीमुळे ती १२-१३ वर्षांचीच वाटत असल्याने आणि इकडे-तिकडे फिरत असल्याचे पाहून नागरिकांनी हिंगणा पोलिसांना सूचना दिली. त्यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत उषाला विचारपूस केली. बोबडे बोल काढत तिने बुलडाणा जिल्ह्यातील काही गावांचा उल्लेख केला. त्यामुळे ती बुलडाणा जिल्ह्यातील असावी, अशी पोलिसांना खात्री झाली. तिला मुलींच्या वसतिगृहात सोडले आणि पोलिसांनी अखेर शोधमोहीम राबविली.हिंगणा पोलीस ठाण्यातील कर्मचारी विक्रांत व विनोद यांनी तिचा फोटो काढून ‘व्हॉटसअ‍ॅप’ या सोशल मीडियाच्या बुलडाणा जिल्ह्यातील ग्रुपवर तो पाठविला. दरम्यान, एका ग्रुपवर वाघुडा येथीलच तरुणाने तिला ओळखले. ती आपल्याच गावची असल्याचे सांगून त्याने उषाचे वडील अशोक धुरंदर आणि आई इंदूबाई यांना ही माहिती दिली. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी सोमवारी (दि. १२) हिंगणा पोलीस ठाणे गाठले. तिथे ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे यांनी शहानिशा करून उषाला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. तेव्हा सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाnagpurनागपूर