शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीला १०० कोटी चंद्रपूरला डावलले

By admin | Updated: July 17, 2014 01:08 IST

शासनाने बारामती येथील नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी कोणताही विलंब न करता १०० कोटी रुपये दिले आहेत. पण चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व

हायकोर्ट : वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रकरणनागपूर : शासनाने बारामती येथील नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी कोणताही विलंब न करता १०० कोटी रुपये दिले आहेत. पण चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला अद्याप निधीची प्रतीक्षा आहे. अ‍ॅड. अनिल किलोर यांनी आज, बुधवारी ही बाब मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. विद्यार्थ्यांना यावर्षीपासूनच एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाला प्रवेश देता यावा, यासाठी चंद्रपूर येथील महिला व बाल रुग्णालयाची इमारत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला तात्पुरती देण्यात यावी, याकरिता राहुल पुगलिया व रामदास वागदरकर यांनी रिट याचिका दाखल केली आहे. परंतु मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने केंद्र शासनाकडे नकारात्मक शिफारशी केल्यामुळे व निर्धारित मुदत संपल्यामुळे, चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात यावर्षीपासून प्रवेश देण्याची शक्यता मावळली आहे. आता पुढच्या वर्षी या महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी आवश्यक तेवढा निधी व सोयीसुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. यामुळे अ‍ॅड. किलोर यांनी वरील माहिती देऊन विदर्भावर वारंवार होण्याऱ्या अन्यायाचा उल्लेख केला. अ‍ॅड. किलोर याचिकेत दुरुस्ती करून चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला निधी व सुविधा योग्य वेळेवर उपलब्ध करून देण्याची नवीन विनंती समाविष्ट करणार आहेत. यासाठी न्यायालयाने त्यांना दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने चंद्रपूर येथे १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशक्षमतेचे महाविद्यालय व ५०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ३ जानेवारी २०१३ रोजी जीआर काढण्यात आला आहे. महाविद्यालय व रुग्णालयासाठी १० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)