बल्लीने हल्ला करून केले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:12 IST2021-09-06T04:12:19+5:302021-09-06T04:12:19+5:30

नागपूर : पाचपावलीच्या लष्करीबागमध्ये एका व्यक्तीला बल्ली मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. चंद्रप्रकाश शर्मा (४५) असे जखमी झालेल्या ...

Bally attacked and injured | बल्लीने हल्ला करून केले जखमी

बल्लीने हल्ला करून केले जखमी

नागपूर : पाचपावलीच्या लष्करीबागमध्ये एका व्यक्तीला बल्ली मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. चंद्रप्रकाश शर्मा (४५) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शर्मावर शनिवारी रात्री राजेश वालदे, आशिष साखरे यांनी शर्मा यांना शिवीगाळ करून बल्ली आणि दगड मारून जखमी केले. पाचपावली पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

.........

चाकूसह मिळाला आरोपी

नागपूर : शांतीनगर पोलिसांनी टेलिफोन एक्सचेंज परिसरातील गुन्हेगार आकाश राजपुतला चाकूसह अटक केली आहे. हवालदार राजेश चंदेल यांना शनिवारी रात्री आकाश बाईकवर संशयास्पद स्थिती दिसला. चंदेल यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने पाठलाग करून आकाशला पकडले. त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला आहे.

..........

दुचाकी स्लिप झाल्यामुळे मृत्यू

नागपूर : दुचाकी स्लिप झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. संपत धुवारे (५४) रा. अमरनगर असे मृतकाचे नाव आहे. ते दुचाकीवर स्वार होऊन एमआयडीसीतील अमरनगरात जात होते. दरम्यान, दुचाकी स्लिप झाल्यामुळे ते खाली पडून जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

.....

Web Title: Bally attacked and injured