कळमेश्वर शहरातून बाेलेराे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST2021-03-09T04:10:39+5:302021-03-09T04:10:39+5:30

कळमेश्वर : नागपूर रिंगराेड लगत असलेल्या कळमेश्वर शहरातील माेवाडे लेआऊटमध्ये उभी असलेली मालवाहू बाेलेराे अज्ञात चाेरट्याने चाेरून नेली. ही ...

Balerae Lampas from Kalmeshwar city | कळमेश्वर शहरातून बाेलेराे लंपास

कळमेश्वर शहरातून बाेलेराे लंपास

कळमेश्वर : नागपूर रिंगराेड लगत असलेल्या कळमेश्वर शहरातील माेवाडे लेआऊटमध्ये उभी असलेली मालवाहू बाेलेराे अज्ञात चाेरट्याने चाेरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. ४) मध्यरात्री घडली असून, नुकतीच पाेलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संदीप पांडुरंग कामडी रा वाॅर्ड क्रमांक-१७, कळमेश्वर हे शेतमालाच्या वाहतुकीचा व्यवसाय करीत असल्याने त्यांच्याकडे एमएच-३६/एफ-२९५७ क्रमांकाची मालवाहू बाेलेराे हाेती. त्यांनी ती नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री त्यांच्या माेवाडे ले-आऊट येथील घरासमाेर उभी ठेवली हाेती. दरम्यान, मध्यरात्री कुणाचेही लदक्ष नसताना अज्ञात चाेरट्याने ती बाेलेराे चाेरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आल्याने त्यांनी परिसरात चाैकशी करून त्या बाेलेराेचा नागपूर, भंडारा, वरूड, अमरावती, मुलताई (मध्य प्रदेश) यासह अन्य शहरात शाेध घेतला. ती कुठेही आढळून न आल्याने शेवटी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Balerae Lampas from Kalmeshwar city