शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

तीन बछड्यांसह वाघिणीवर विषप्रयोग करणाऱ्या दिवाकरचा जामीन नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

नागपूर : आपल्या मालकीच्या कालवडीला वाघिणीने ठार केले, यामुळे बदल्याच्या भावनेतून विषप्रयोग करून वाघिण आणि तिच्या तीन बछड्यांना ठार ...

नागपूर : आपल्या मालकीच्या कालवडीला वाघिणीने ठार केले, यामुळे बदल्याच्या भावनेतून विषप्रयोग करून वाघिण आणि तिच्या तीन बछड्यांना ठार करणाऱ्या दिवाकर दत्तू नागेकर या आरोपीला जामीन नामंजूर झाला आहे. त्याची रवानगी १० फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील कऱ्हांडला वनक्षेत्रात ही घटना घडली होती. नववर्षदिनी ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एका बछड्याचे शव आढळले होते. नवेगाव साधू या गावातील दिवाकर दत्तू नागेकर या व्यक्तीने हे कृत्य केल्याचे वन विभागाच्या आणि पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली होती.

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी उमरेड यांच्याकडे आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र हे कृत्य अत्यंत भीषण असून एकाच वेळी चार वाघांचा यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेत सहानुभूती दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे न्यायालयाने सांगत त्याचा जामीन अर्ज फेटाळला. १० फेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी शासनाच्या वतीने विशेष सल्लागार कार्तिक शुक्ल यांनी भक्कमपणे बाजू मांडली. सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. अजित साजणे हे याप्रकरणी तपास करीत आहेत.