शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यमान भारत योजना : ‘नी’, ‘हिप रिप्लेसमेंट’ शासकीय रुग्णालयातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 22:35 IST

आयुष्यमान भारत योजना सुरू होऊन ११ महिन्याचा कालावधी होत असताना ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत.

ठळक मुद्दे११ महिन्यानंतरही खासगी इस्पितळांना ठेवले दूर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आयुष्यमान भारत योजना सुरू होऊन ११ महिन्याचा कालावधी होत असताना ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत. खासगी इस्पितळांना या शस्त्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे. यामागे योजनेत शस्त्रक्रियेसाठी फार कमी निधी असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, मेयो व मेडिकलमध्ये या दोन्ही शस्त्रक्रियेचा भार वाढल्याने शेकडो रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात नागपूर जिल्ह्यात २३ सप्टेंबर २०१८ पासून झाली. या योजनेत नागपूर शहरातील २ लाख ३९८ तर ग्रामीणमधील १ लाख ७६ हजार ९०३ असे मिळून ३ लाख ७७ हजार ३०१ पात्र कुटुंबीयांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा रुग्णालयातून ही योजना सुरू झाली, तर चार महिन्यांपूर्वी दुसऱ्या टप्प्यात खासगी इस्पितळांचा समावेश करण्यात आला आहे. यात आशा हॉस्पिटल, गिल्लूरकर हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटल, महात्मे आय हॉस्पिटल, मोगरे हॉस्पिटल, एचसीजी एनसीआयएचआरआय, सूरज आय हॉस्पिटल, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठा, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट वेस्ट हायकोर्ट रोड, स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, कुणाल हॉस्पिटल, शुअरटेक हॉस्पिटल, अर्चनेगेल हॉस्पिटल, मेडिकल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सारक्षी नेत्र हॉस्पिटल आदी २३ इस्पितळांचा समावेश आहे. यातील काही खासगी इस्पितळे गुडघा (नी) व ‘हिप’ प्रत्यारोपण करण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याकडे रुग्णही आहेत. परंतु आयुष्यमान भारत योजनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आड येत आहेत.सूत्रानुसार, खासगी इस्पितळांमध्ये या शस्त्रक्रियेला दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. योजनेत शस्त्रक्रियेचा खर्च केवळ ९० हजार रुपये आहे. खासगी रुग्णालयात लाभार्थी रुग्णांकडून वरील पैसे घेण्याची शक्यता आहे. यामुळे ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ या दोन्ही शस्त्रक्रिया मेयो व मेडिकलमध्येच करण्याच्या सूचना असल्याचे बोलले जाते. परंतु या दोन्ही रुग्णालयात अस्थिव्यंगोपचाराचे इतरही रुग्ण राहत असल्याने आठवड्यातून एक किंवा दोनच शस्त्रक्रिया होतात. विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातूनही शस्त्रक्रियेसाठी रुग्ण येत असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. काहींना महिनाभरानंतर शस्त्रक्रियेसाठी बोलविले जात असल्याने खासगी इस्पितळांमध्ये याबाबत विचाराणा होत आहे, परंतु रुग्णांच्या पदरी निराशा पडत आहे.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतGovernmentसरकारhospitalहॉस्पिटल