शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

महागाई रोखा कर सवलती द्या

By admin | Updated: June 30, 2014 00:47 IST

केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार येत्या १० जुलैला २०१४-१५ साठीचा आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. महागाई रोखण्यात यश येईल आणि दिलासा मिळेल,

नागपूर : केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार येत्या १० जुलैला २०१४-१५ साठीचा आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. महागाई रोखण्यात यश येईल आणि दिलासा मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पापासून आहे. लोकसभा निवडणुकांमुळे संपुआ सरकारने यंदा फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. सत्तेवर येताच नरेंद्र मोदी सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात सरसकट १४ टक्के आणि मालभाड्यात ६ टक्के वाढ करून सर्वसामान्यांना पहिला झटका दिला. निदान अर्थसंकल्पात तरी काही सवलती आणि दिलासा मिळावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.खिसा रिकामा करू नयेअच्छे दिन आनेवाले है, महागाई कमी करू असे सांगत सत्ता मिळवणाऱ्या भाजपने पहिल्याच महिन्यात महागाई अधिक भडकवणारा निर्णय घेतला. त्यामुळे मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे अर्थतज्ज्ञांसह, उद्योग जगत सर्वसामन्यांचे लक्ष आहे. कठोर निर्णयाच्या नावाखाली निदान आता तरी, मोदी सरकारने खिसा रिकामा करू नये, अशीच सर्वसामान्यांची या अर्थसंकल्पापासून अपेक्षा असेल.कर कायद्यात बदल व्हावेकर कायद्यात बदल होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. नवीन प्रत्यक्ष कर कायद्याची माहिती नागरिकांना करून द्यावी. टीडीएसवर असलेली दंडाची तरतूद रद्द व्हावी. करदाता कर भरण्यास इच्छुक आहे. किचकट कर प्रणालीतून त्याला सुटका हवी. कायदा सरळसोपा झाल्यास आजचा युवा उत्साहाने कर भरेल. बँकिंग प्रणाली सक्षम केल्यास बहुतांश व्यवहार बँकिंगच्या माध्यमातून होतील, त्यामुळे काळ्या पैशाला वाव राहणार नाही. त्याममुळे अर्थव्यवस्था सक्षम होण्यासाठी हातभार लागेल. सध्या अप्रत्यक्ष कराची वसुली वाढली आहे. कराद्वारे उत्पन्न वाढीसाठी सेवा कराची आकारणी समान आणि कमी करावी, अशी सामान्यांची मागणी आहे. कर मर्यादा वाढवावी आणि सेक्शन ८० सी अंतर्गत बचतीची मर्यादा एक वरून दोन लाखांवर न्यावी. करदात्याचा विश्वास अधिक दृढ होण्यासाठी कर कायद्यात सुधारणा करा.औद्योगिक विकास हवारोजगाराची द्वारे खुली करण्यासाठी औद्योगिक विकास हवा. त्यासाठी विशेष आणि प्रोत्साहनपर योजनांची घोषणा हवी. औद्योगिक उत्पादन वाढीच्या प्रक्रियेला कशी चालना देता येईल, या दृष्टीने पाहणे निकडीचे आहे. लघू व मध्यम उद्योगांसाठी योजना हव्यात.सर्वांगीण विकास हवासामान्यांना वित्तीय तुटाची आकडेमोड समजत नाही. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या गरजेच्या गोष्टी प्रामुख्याने हव्या आहेत. त्यासाठी विशेष योजनांचा आराखडा अर्थसंकल्पात सादर करावा.