शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातील उपस्थिती ‘शंभरी’पार नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : डिसेंबर ते जानेवारीदरम्यान काेराेनाची साखळी तुटत असताना आता काेराेनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने संसर्गाचा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : डिसेंबर ते जानेवारीदरम्यान काेराेनाची साखळी तुटत असताना आता काेराेनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने संसर्गाचा धाेका वाढला आहे. असे असताना लग्न समारंभातील गर्दी कुठे हजार, तर कुठे दाेन हजाराचा आकडा पार करीत आहे. या बाबीची प्रशासनाने दखल घेतली असून, गर्दीची ‘शंभरी’ पार करणाऱ्या मंगल कार्यालयांना कारवाईचा इशारा दिला आहे.

लग्न समारंभातील नागरिकांच्या गर्दीतून कोरोनाला आमंत्रण मिळत आहे. याकडे लक्ष वेधत ‘लाेकमत’ने गुरुवारी (दि. १८) ग्रामीण भागात शुभमंगल 'सावधान' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने शहरातील सर्व मंगल कार्यालये व सेलिब्रेशन लॉन मालकांना लेखी आदेश व सूचना जारी केल्या आहेत.

लग्न समारंभात शंभर‌पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती असू नये, असे आढळल्यास हाॅल मालकास जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असेही आदेशित केले आहे. शिवाय, लग्न समारंभस्थळी प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे. सॅनिटायझरचा वापर, शारीरिक अंतर पाळावे, अशा सूचनाही मंगल कार्यालयांना दिल्याची माहिती तहसीलदार अनिरूध्द कांबळे यांनी दिली. गुरुवारी नगर पंचायत प्रशासनानेसुद्धा मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. याकरिता पाेलीस ठाणे परिसर व मुख्य मार्गावर नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच रस्त्याने विनामास्क फिरताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.