आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 00:14 IST2025-05-24T00:13:44+5:302025-05-24T00:14:47+5:30
जर कुणी अशा प्रकारे संपर्क करायचा प्रयत्न करत असेल तर त्वरित संपर्क करावा असे आवाहन दटके यांनी केले आहे.

आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
योगेश पांडे, नागपूर
मध्य नागपुरचे आमदार प्रवीण दटके यांच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विविध योजनांच्या नावे नागरिकांची दिशाभूल करण्याचा आरोपीने प्रयत्न केला. दटके यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शहरात राबविल्या जात आहेत. काही योजनांचे नाव घेत अज्ञात आरोपीने मध्य नागपुरातील काही लोकांना संपर्क केला व त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.
काही लोकांनी दटके यांना योजनांबाबत विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. हे काम आमच्या कुठल्याही परिचिताकडून झालेले नसून हा प्रकार धक्कादायक आहे.
कुणीतरी जाणुनबुजून फसवणूक करत आहे. आम्ही पोलिसांत तक्रार केली आहे. जर कुणी अशा प्रकारे योजनांच्या नावे संपर्क करायचा प्रयत्न करत असेल तर त्वरित संपर्क करावा असे आवाहन दटके यांनी केले आहे.